विचारवेध' ह्या लेखसंग्रहामध्ये पुस्तकाच्या शीर्षकासारखेच काही मोजक्या विविध विषयांचा वैचारिक वेध घेणारे अभ्यासपूर्ण व विचारप्रवण असे २५ आकलनसुलभ लेख आहेत.
पहिल्याच शीर्षकीय 'विचारवेध' ह्या लेखामध्ये विचारांचे सामर्थ्य, सकारात्मक विचारांचा मानवी मनावर पडणारा सुप्रभाव सांगितला आहे तर दुसऱ्या 'विचारसाम्य' ह्या एका आगळ्यावेगळ्या लेखामध्ये अनेकविध विचारवंतांमध्ये, साहित्यिकांमध्ये, शास्त्रज्ञांमध्ये विचारांचा, कल्पनांचा सारखेपणा कसा असू शकतो हे सोदाहरण स्पष्ट केले आहे.
शिक्षणावर विवेचन करताना शिक्षणासंबंधित लेखांमध्ये शिक्षण, कालचे व आजचे शिक्षण, शिक्षक-विद्यार्थी, विद्या-ज्ञान, वैज्ञानिक शिक्षण असे शिक्षणाचे विविध कंगोरे स्पष्ट करीत मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व विषद केले आहे.
साहित्यविषयक लेखांमधून वाङमयाचे साहित्य, बालसाहित्य, विज्ञानसाहित्य, कथा, कविता, कादंबरी, लेख, नाटक, ललित, चरित्रे, समीक्षा आदि बहुविध पैलू स्पष्ट करीत मानवी जीवनातील साहित्याचे व ग्रंथांचे महत्वही प्रतिपादिले आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधानुकरण, ज्योतिषशास्त्र, धर्म, विज्ञान, अध्यात्म, लुप्तप्राय होत असलेली सर्कस, आपल्या भारतीय संस्कृतीची महानता, देशभक्ती, शेतकऱ्याची हलाखीची दयनीय अवस्था आदि बाबींवरसुध्दा प्रकाश टाकलेला आहे व निराशग्रस्तांचे नैराश्य घालवण्यासाठी काही साधेसोपे नेहमी करता येण्यासारखे अमोल उपायसुध्दा सुचवलेले आहेत.
एकंदरीत हा लेखसंग्रह वाचनीय, विचारप्रवर्तक व चिंतनीय असल्याने प्रत्येक रसिकाने तो एकदा तरी जरूर वाचावा असाच आहे एवढे मात्र निश्चित. प्रकाशक
Pickup available at HO
Usually ready in 24 hours