{"product_id":"vidrohi-vasant-rajas","title":"विद्रोही वसंत राजस | Vidrohi Vasant Rajas","description":"\u003cp\u003eबेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठातील डॉ.संजय कांबळे हे उत्तम संशोधक असून त्यांचा ‘विद्रोही वसंत राजस’ हा ग्रंथ परिवर्तनाच्या चळवळीसाठी उपयुक्त आहे. वसंत राजस यांची बहुआयामी तात्विक भूमिका आणि त्यांच्या विचारगर्भ ग्रंथांचा मुलगामी अभ्यास करून लेखकाने समाजाभिमुख संशोधन केलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबोधन पर्वावर वसंत राजस यांनी निष्ठेने अनेक ग्रंथातून भाष्य लिहिले. आणि तोच आंबेडकरी विचार पुढे घेऊन जाताना वसंत राजस यांच्या ललित व वैचारिक साहित्याचा सूक्ष्म अभ्यास डॉ. संजय कांबळे यांनी अधोरेखित केला. सत्यशोधक विचारांचा ‘ढोलगरवाडीचा वाघ’ बौद्ध तत्त्वज्ञानाची मीमांसा देवदासींच्या वेदनामुक्ती पासून बहुजनांच्या व भारताच्या भवितव्याचे विषय वसंत राजस आणि पर्यायाने डॉ. संजय कांबळे यांनी निर्णायक महत्त्वाचे मानले. आंबेडकरी चळवळीच्या मारेकर्यावरील भाष्यही तितकेच महत्त्वाचे ठरते. संवाद- संघर्षवादी आंबेडकरी विचार शास्त्रीय मानवतावादाचे केंद्र आहे. आज विश्व समाज व भारतीय पर्यावरण सर्वार्थाने अध: पतीत झालेल्या वर्तमानात डॉ. संजय कांबळे यांचे संशोधन पुण्याची पेरणी करणारे ठरते. बुद्ध- आंबेडकरी विश्वात्मकताच मानव कल्याणकारी प्रवाह आणि मानदंडीशी संवादी ठरून त्यातच विश्वशांती व विश्व कल्याण सामावल्याचे सत्य हा ग्रंथ सांगतो. कारण डॉ. संजय कांबळे विवेकी विद्रोहाची नवी मांडणी करतात. अभिनंदन! -डॉ. श्रीपाल सबनीस अध्यक्ष, ८९ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन पिंपरी -पुणे\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281392005203,"sku":"9.78936E+12","price":371.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Vidrohi_20Vasant_20Rajas_20front.jpg?v=1795505107","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/vidrohi-vasant-rajas","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}