Skip to product information
Ye Hrudayiche Te Hrudayi | ये हृदयीचे ते हृदयी By Rekah Chaware Jain | रेखा चवरे जैन
Rs. 1,270.00
Pages: 260
Language: Marathi

या ऐतिहासिक कलाकृतींची निर्मिती कथा ऐतिहासिक आहे. "ये हृदयीचे ते हृदयी" हा ग्रंथ म्हणजे कलानिर्मितीच्या स्मरणांचा अपूर्व ठेवा आणि निर्मितीची दृष्टी देणारा बहुमोल खजिना आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वीच्या काळापासूनच्या संगीताचा हा इतिहास आहे. पंडितजींचे संगीताबद्दलचे विचार व सूक्ष्म चिंतन यात मांडलं आहे.
हे चित्रण केवळ गाणं संगीतबद्ध करण्याच्या निर्मितीचंच नाही, तर निर्मितीत रंगलेल्या अस्सल कलावंताचंही हे चित्रण आहे. नादब्रह्माच्या उपासकाच्या सर्जनशीलतेच्या आणि परिपूर्णतेच्या ध्यासाचं, त्याच्या संगीतावरील निष्ठेचं हे चित्रण आहे. एका सच्च्या उत्तुंग कलावंताच्या निर्मिती करतानाच्या समाधी अवस्थेचं एवढंच नाही, तर 'सहज निटू झाला' या ज्ञानेश्वर माउलींच्या पंक्तीचंदेखील हे चित्रण आहे. अभिजात कलाकृतीची निर्मिती होत असताना कलावंताला होणाऱ्या प्रसववेदना, यातना, बेचैनी, तडफड, तगमग, अस्वस्थता आणि कलाकृती साकारल्यानंतरचा अनिर्वचनीय आनंद याचं हे अतिशय सूक्ष्म, तरल आणि सौंदर्यपूर्ण रेखाटन आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Ye Hrudayiche Te Hrudayi | ये हृदयीचे ते हृदयी By Rekah Chaware Jain | रेखा चवरे जैन

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like