{"product_id":"yog-purankatha-by-devdutt-pattanaik-matthew-rulli-madhavi-kulkarni","title":"Yog Purankatha| योग पुराणकथा By Devdutt Pattanaik, Matthew Rulli,Madhavi Kulkarni| देवदत्त पट्टनायक, मॅथ्यू रॉली , माधवी कुलकर्णी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eवीरभद्रासन आणि हनुमानासनापासून मत्स्येंद्रासन, कूर्मासन आणि अनंतासनापर्यंत\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअनेक योगासनांची लोकप्रिय नावे भारतीय पुराणकथांमधील पात्रे आणि श्रेष्ठ व्यक्तींवर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआधारित आहेत. ही पौराणिक पात्रे कोण होती, त्यांच्या कथा काय आहेत आणि\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eयोगासनांशी त्यांचा काय संबंध आहे? देवदत्त पट्टनाईक यांचे अलीकडील पुस्तक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e‘योग पुराणकथा’ (सहलेखक – आंतरराष्ट्रीय योग साधक मॅथ्यू रॉली) हे पुस्तक हिंदू,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबौद्ध आणि जैन धर्मातील पूर्वापार चालत आलेल्या लोककथा आपल्याला पुन्हा सांगते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजगाला सुपरिचित असलेल्या योगासनांच्या मागे या कथा आहेत. 64 महत्त्वाच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआसनांमागील कथांच्या हकिकती सांगताना शाश्वत सत्ये, पुनर्जन्म, मुक्ती आणि सहवेदना\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया संकल्पनांवर आधारित भारतीय उपखंडातील दृष्टिकोनाकडे देवदत्त आपले लक्ष वेधतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहजारो वर्षे या संकल्पना योगाचे संवर्धन करत आहेत. या पुस्तकात आसनांमधील शरीराच्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविशिष्ट स्थितीबद्दल विचार मांडले आहेत. असे असले तरी आसने कशी करावीत याविषयी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक नाही. एक ज्ञानशाखा म्हणून योगाकडे बघताना त्याचे मानसिक, आध्यात्मिक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदृष्टिकोन आणि योगदान, तसेच त्यामागील तत्त्वज्ञान, परंपरा, संस्कृती समजावून घेणं\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआवश्यक असते. तीन हजाराहून अधिक वर्ष प्रभाव असलेल्या या कथांनी जागतिक\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदृष्टिकोन आकारास आणला. अशा सर्वांची ओळख हे पुस्तक करून देते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":67608017240147,"sku":null,"price":420.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Yog-cover-600x600-1_4762df00-6753-430d-8293-529eb2bf73af.jpg?v=1791283179","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/yog-purankatha-by-devdutt-pattanaik-matthew-rulli-madhavi-kulkarni","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}