{"product_id":"youvan-te-vivah-यौवन-ते-विवाह-by-pr-deoba-shivaji-patil-प्रा-देवबा-शिवाजी-पाटील","title":"Youvan Te Vivah | यौवन ते विवाह By Pr Deoba Shivaji Patil | प्रा देवबा शिवाजी पाटील","description":"\u003cp\u003e'यौवन ते विवाह' ह्या पुस्तकात मानवी जीवनातील 'यौवनापासून ते विवाहापर्यंत' ह्या एका महत्वाच्या टप्प्याचा प्रवास रेखाटला आहे. यौवनाची वाटचाल करतांना तरुणाईने आपले भवितव्य कसे घडवावे, आपले जीवन कसे उजळवावे, यौवनाच्या विविध टप्प्यांवर कसे वागावे, यौवनात कसे सतत सावध रहावे, स्वतःला कसे सावरावे, समाजात वावरतांना कसे वागावे, आपला जोडीदार निवडतांना कसे सतर्क राहावे, शुभविवाहाचे मंगल रूप किती सुंदर आहे आदि बाबींचे सखोल विवेचन केले आहे.\u003cbr\u003eआजच्या युवक-युवतींनी आपले शारीरिक आरोग्य निरोगी व मानसिक स्वास्थ्य निकोप राखावे, उद्योगशील व व्यवहारकुशल बनावे, जबाबदार पालक व्हावे, कुटुंबाला अभिमानास्पद व समाजाला भूषणावह असे त्यांचे आचरण असावे आणि आपल्या देशाला यशाच्या अत्युच्च शिखरावर नेणारे त्यांचे कर्तृत्व असावे हाही हे पुस्तक लिहिण्यापाठीमागचा हेतू आहे.\u003cbr\u003eवैवाहिक जीवनात संघर्ष हे होतच असतात परंतु विवाहाआधीच काही गोष्टींची कल्पना असली तर ते संघर्ष टाळताही येतात व आपले वैवाहिक जीवन सुखद बनवता येते. अशाच काही गोष्टींचीही ह्या पुस्तकातून जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला आहे.\u003cbr\u003eतरुणाईने आपले नैराश्य कसे टाळावे, समस्या कशा हाताळाव्यात, मनोबल कसे वाढवावे, मनाचे संतुलन कसे राखावे व आयुष्य कसे फुलवावे ह्याबाबतही ह्या पुस्तकात साध्या सोप्या भाषेत मार्गदर्शन केले आहे. एकंदरीत प्रत्येक युवक-युवतीने हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे व वारंवार वाचावे, त्यावर चिंतन करावे नि त्यानुसार सद्वर्तन करून आपले जीवन तेजस्वी बनवावे यासाठी त्यांना हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Yashashree Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45953644953683,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_2_e3fd077a-f12d-4c37-86af-14a9a69f4114.jpg?v=1786537371","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/youvan-te-vivah-%e0%a4%af%e0%a5%8c%e0%a4%b5%e0%a4%a8-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9-by-pr-deoba-shivaji-patil-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%ac%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%b2","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}