{"product_id":"yuddha-nakarnare-jag-by-sundeep-waslekar","title":"Yuddha Nakarnare Jag | युध्द नाकारणारे जग By sundeep Waslekar | संदीप वासलेकर","description":"\u003cp\u003eयुद्धाला द्यायला हवा ठाम नकार... \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगाला संघर्षांनी वेढलेले असताना युद्ध आणि शांतता यांचा सम्यक विचार \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकरणार्या या पुस्तकाचे महत्त्व अजोड आहे. संदीप वासलेकर हे आंतरराष्ट्रीय \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकीर्तीचे विचारवंत, ऑक्सफर्डचे स्कॉलर आणि ‘एका दिशेचा शोध' या १३ \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवर्षांत २५ आवृत्त्या निघालेल्या राजहंसी पुस्तकाचे लेखक आहेत. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयुद्धांमागील राजकारण, प्राणघातक शस्त्रास्त्रांच्या शर्यती, अतिरेकी राष्ट्रवादाचे \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eदुष्परिणाम यांचा उदाहरणांसह परखड उहापोह या पुस्तकात वाचायला मिळेल. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवी संस्कृती व सभ्यता यांच्या विनाशाची शक्यता संहारक युद्धांमुळे वाढत \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचालली आहे, हे सत्य सुस्पष्टपणे मांडले आहे. सर्वनाश टाळायचा तर मानवी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमाजाने एकत्र येऊन आणि राजकीय नेत्यांना बाजूला ठेवून ठामपणे युद्धांना \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनकार दिला पाहिजे, असा लेखकांचा निष्कर्ष आहे. त्यासाठी त्यांनी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान आणि इतिहास यांचा योग्य \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरामर्श घेतला आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयुद्ध हा मानवजातीचा नैसर्गिक गुणधर्म नाही. शांतता व युद्ध यातून शांततेची \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिवड करण्याची मुभा आपल्याला आहे, असे हे पुस्तक ठामपणे बजावते. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकीकडे धोक्याचा इशारा आणि दुसरीकडे विचारांना चालना हे त्याचे वैशिष्ट्य.\u003c\/p\u003e","brand":"Rajhans Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45912584323155,"sku":null,"price":550.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/cover_original_6a94a01e-9d6d-47d5-adb4-73e2417f1905.webp?v=1785927346","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/yuddha-nakarnare-jag-by-sundeep-waslekar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}