Skip to product information
Yuddhanantar...
Rs. 200.00
Language: Marathi

आदित्य दवणे यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह. युद्ध ही एक थीम, एक विषय घेऊन ते लिहितात. खरंतर आजचा सगळा काळच अस्वस्थतेचा काळ आहे, तरी या कवीला इच्छा आहे युद्धभूमीचं नंदनवन करण्याची, इतिहासातून बोध घेत नवी पिढी घडवण्याची. माणसामाणसात पेटलेल्या आणि पेटवल्या जाणार्‍या युद्धानं तो अस्वस्थ होतो.

संवेदनशील आणि सर्जनशील मनांवर आलेलं दडपण त्याला जाणवत राहतं. त्याला आजच्या परिस्थितीतील दाहकता कळलेली आहे. कधी विरोधाभास दाखवून, तर कधी उपरोधाचा सूर लावून तो कळकळीनं सांगत राहतो माणसाच्या मनात पेटलेल्या युद्धांबद्दल, युद्धानं दिलेल्या एकटेपणाबद्दल, तुटलेपणाबद्दल, माणसांतल्या जनावरांबद्दल, माणसाच्या असहाय्यतेबद्दल, त्याच्यातल्या माणूसपणाबद्दल. या कवीची श्रद्धा आहे आपल्या शब्दांवर आणि त्यातल्या अर्थांवर.

ते अर्थ तो नेमकेपणाने आपल्यापर्यंत पोचवतो. माणसात लपलेल्या हिंस्रतेचे अनेकविध पदर उलगडून दाखवणारा हा कवी त्याच्यातल्या माणूसपणाचेही अनेकदा दर्शन घडवतो. नीरजा हे इतिहासविषयक मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

युध्दानंतर ... | Yuddhanantar...

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like