Skip to product information
Sale price
Rs. 112.50
Regular price
Rs. 150.00
Overview:
मराठी काव्यजगतामध्ये स्वतःची स्वतंत्र अशी नाममुद्रा उमटविणारे कवी म्हणून उद्धव कानडे ओळखले जातात . त्यांच्या कवितेने नेहमीच श्रमाचे मोल आणि घामाचा अर्थ सांगितला आहे . या संग्रहात तर त्यांची कविता वेदनांचा मोहोळ होऊनच येते . हे मोहोळ वाचकांना दंश तर करतेच , पण अंतर्मुख करते . व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागते . ज्या श्रमिकांच्या श्रमावर जग उभे राहते , त्या श्रमिकांनाच पायदळी का तुडवले जाते हा तो कळीचा प्रश्न होय . या प्रश्नाच्या शोधातून मग वेदनांचा गाव साकार होत जातो . या गावाच्या केंद्रस्थानी आहे आई आणि आईचेच दुसरे रूप असणारी भूमी . आईचे श्रम , वेदना अन अजिंक्य आत्मविश्वास ठायीठायी व्यक्त होत जातो . भूमीचे उदारपण आणि आज जागतिकीकरणामध्ये तिला आलेली अवकळाही व्यक्त होत जाते . हे सारे साकार करणारी त्यांची एकएक कविता मग घामाचे एकएक सुक्त बनत जाते . ही सारी सुफ्ते जीवनाच्या पुन पुनर्मांडणीचे भान देऊन जातात . त्यांची एकएक कविता व्यवस्थेवर केलेला वारच असतो . हा वार अधिक धारधार होतो , तो तिच्यातील अतंर्गत लयीमुळे . त्यामुळेच ती गेय आणि कमालीची उत्कट होत जाते .

Pickup currently not available