Skip to product information
Sale price
Rs. 187.50
Regular price
Rs. 250.00
Overview:
जन्मापासून अखंड सोबत करणार्या मृत्यूला सामोरं जाणं मानवी मनाची कसोटी पाहतं. त्यात मृत्यूने आगमनाची पूर्वसूचना-तीही थोडी आधीच-दिल्यास त्याला स्वीकारणं सोपं जातं. मृत्यूने अचानक येऊ नये, तो आला तरीही, विशेष त्रास न देता शांतपणे यावा, तो वेदनारहित असावा किंवा वेदना अपरिहार्य असल्यास त्याने सुसह्य वेदनांसह यावं, सर्व प्रिय, आप्त सोबत असताना यावा या व अशा अनेक अटी आपण मृत्यूसमोर दिवसरात्र ठेवत असतो. जगणं जाणून घेण्याच्या प्रयत्नात मृत्यू जाणून घेणं राहूनच जातं. आपल्या व आपल्या जवळच्या माणसाच्या मृत्युपूर्व दु:खाची परिमाणं समजून घेण्यासाठी विवेकी आंतरिक संवादाची गरज असते. नेमका हा संवादच मृत्युपूर्व दु:खातील कोलाहलात राहून जातो. मग वेदनेसोबत येणारं दु:ख अनाकलनीय होत जातं. मृत्युपूर्व अस्वस्थता, प्रत्यक्ष मृत्यू, त्यानंतर काळजीवाहकाला वाटणारं दु:ख हे सारं समजून घेण्याऐवजी टाळण्याकडे आपला कल वाढत जातो. मग दु:खाची कधी न सुटणारी निरगाठ होऊन बसते. त्यातून मागे उरलेल्यांचं मन:स्वास्थ्य हळूहळू बिघडू शकतं. घटना केव्हाच भूतकाळात वाहून गेलेली असते; मागे रेंगाळत राहते, जीवनाला ग्रासून टाकणारी असह्य अस्वस्थता!! अशा वेळी - खरंतर त्याही आधी डॉ. संज्योतचे हे विवेकनिष्ठ, मृदू, संवेदनशील, सहजसोपे विवेचन समजून घेणे संजीवक ठरू शकेल. मराठी साहित्यात मानसशास्त्र समजावून देणार्या ह्या पुस्तकाने मोलाची भर पडेल, यात शंका नाही. - डॉ. प्रदीप पाटकर, मनोविकारतज्ज्ञ Atal Dukhatun Sawartana – Jivalaganchya Mrutyuvishayi viveknishth, wyawaharik aani Sawedanshil sanwad Author – Dr. Sanjyot Deshpande अटळ दुःखातून सावरताना – जिवलगांच्या मृत्यूविषयी विवेकनिष्ठ, व्यावहारिक आणि संवेदनशील संवाद लेखक – संज्योत देशपांडे

Pickup currently not available