Skip to product information
Overview:
चिंता का करता ? चिंता म्हणजे नेमकं काय? मनात सतत कुरतडणारी काळजी, छातीत येणारी कळ, भविष्यात काय होईल याची अनामिक धास्ती, किंवा दैनंदिन छोट्या गोष्टींनी अस्वस्थ होणं? कधी कधी आपण उठल्यापासून झोपेपर्यंत एका अदृश्य दडपणाखाली जगत असतो. काम, नाती, पैसा, आरोग्य, स्पर्धा, सुरक्षितता प्रत्येक गोष्ट काळजीचं एक नवं कारण घेऊन येते. आणि हे इतकं सामान्य झालंय की चिंता करणे हेच जणू जीवनाचा भाग बनलं आहे. पण इथेच खरी अडचण लपलेली आहे. चिंता फक्त एक भावना नाही, ती आपल्या निर्णयांवर, वर्तनावर आणि नात्यांवर सावली टाकणारी शक्ती आहे. सिगमंड फ्रॉइडसारख्या मानसशास्त्रज्ञांनी तिचे अनेक स्तर उघड केलेनसांत निर्माण होणारी अस्वस्थता, मनातील दडपलेल्या भीती, आणि माणूस आपल्या रोजच्या वागण्यात चिंता कमी करण्यासाठी अनाहुतपणे करत असलेले प्रयत्न. हे पुस्तक त्या चिंतेचा उलगडा करतं. तिचा उगम, तिचं विज्ञान आणि तिच्यापासून मुक्त होण्याचे मार्ग उजळून दाखवतं. वाचत असताना तुम्हाला जाणवेल की आपण ज्या काळजीला ‘सहज नैसर्गिक’ मानतो, ती प्रत्यक्षात समजून घेतल्यावर किती नियंत्रित करता येते. मनावरची धूसरता कमी झाली की जग वेगळं दिसायला लागतं आणि कदाचित पहिल्यांदाच तुम्ही स्वतःला विचाराल, “चिंता का करता?”

Pickup currently not available