Skip to product information
Sale price
Rs. 400.00
Regular price
Rs. 500.00
Overview:
Gawgada : Shatabdi Awrutti | गावगाडा : शताब्दी आवृत्ती'त्रिंबक नारायण आत्रे यांनी १९१५ साली लिहिलेल्या गावगाडा या बहुचर्चित ग्रंथाची ही शताब्दी आवृत्ती. त्यांनी स्वत: या ग्रंथाचे वर्णन ‘Notes on Rural Sociology and Village Problems with special reference to Agriculture असे केलेले आहे. या आपल्या ग्रंथात त्यांनी गावाचे स्वायत्त स्वयंसिद्ध प्रशासन, गावाच्या आर्थिक व्यवहारातील शेतक-याचे केंद्रवर्ती स्थान, बलुतेदारी, वतनपद्धती आणि तत्कालीन गावगाडयाची कोसळू लागलेली अवस्था इत्यादींची साधार, सप्रमाण चिकित्सा केलेली आहे. या विशेष आवृत्तीमध्ये लेखक आत्रे यांच्या गावगाडा ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीची मूळ संहिता, त्यावरील महत्त्वाची अशी समकालीन समीक्षा, धनंजयराव गाडगीळ, स. ह. देशपांडे व सुमा चिटणीस या अभ्यासकांनी स्वातंत्र्योत्तर काळात केलेली सामाजिक-आर्थिक चिकित्सा आणि ग्रंथशताब्दीच्या निमित्ताने मुद्दाम लिहवून घेतलेले मिलिंद बोकील व नीरज हातेकर – राजन पडवळ यांचे लेख, तसाच सदानंद मोरे यांचाही लेख समाविष्ट आहे. संपादक द. दि. पुंडे यांची सुदीर्घ विवेचक प्रस्तावना आणि परिशिष्ट यांतूनही आत्रे यांच्या ग्रंथाचे अंतरंग उलगडून घेण्यास साहाय्य होणार आहे. आत्रेरचित गावगाडाची ही शताब्दी आवृत्ती ग्रामीण अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कृषिविज्ञान इत्यादी क्षेत्रांतील अभ्यासकांना तर उपयुक्त आहेच; पण त्याशिवाय गावप्रशासनात गुंतलेल्या सर्व प्रशासकीय अधिका-यांना तसेच जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांमधील जबाबदार कार्यकर्त्यांनाही विशेष मार्गदर्शक ठरणारी आहे.

Pickup currently not available