Skip to product information
Sale price
Rs. 131.25
Regular price
Rs. 175.00
Overview:
जीवशास्त्रातील प्रज्ञावंत शोधव्रती…. ज्यांनी मानवी कल्याणाच्या ध्यासातून संशोधनाचे कष्टमय कार्य केले. त्यासाठी अविरत झटल्या. या महिला संशोधकांनी आपल्या कार्याद्वारे जगाच्या नकाशावर आपला ठसा उमटवला; पण हे करताना त्यांना प्रत्यक्ष काय संघर्ष करावा लागला…? त्यांच्या आयुष्यात यामुळे कोणती वादळे उठली…? याची उत्तरे या पुस्तकात सापडतील. एकीकडे ज्ञानप्राप्तीचं चिंतन आणि दुसरीकडे कुटुंब-आप्त यांची चिंता! संशोधनकार्यातील वेग आणि वैयक्तिक पातळीवरील भावनांचा आवेग. या दोन्हींत स्पष्ट रेघ मारत त्यांनी संशोधनाला दिलेले प्राधान्य, मानव कल्याणाची त्यांची धडपड आणि खडतर वाटचालीदरम्यान दोलायमान मनोपटलावरही ठाम राहून त्यांनी सिद्धीस नेलेले कार्य! जीवशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयातील संशोधनात सिद्ध होताना ज्या प्रज्ञावंत स्त्रियांनी अवघे आयुष्य वेचले त्यांचे हे चरित्रबंध! सुप्रसिद्ध विज्ञानलेखक निरंजन घाटे यांच्या खास शैलीतील ही मांडणी वाचकांना अर्थगर्भ आणि सकस वाचनाची अनुभूती देईल.

Pickup currently not available