Skip to product information
Talghar | Maifal by Narayan Dharap avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 337.50 Regular price  Rs. 450.00
Overview:
“ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते. पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या. तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण… पण आता सर्वत्र एक निश्चलता होती-मोठी विलक्षण निश्चलता होती. वारा अजिबात पडला होता. झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती- रातकिड्यांची किरकिर नव्हती-काहीही नव्हते. विलक्षण शांतता. हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे-आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल. सर्व शरीर गारठून बधिर झाल्यासारखे वाटत होते. तिने हात उचलला, तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला-पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते…. जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या…. कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती….आणि या गारठविणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला…. उदासवाणी, घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या…. आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट, दुष्टतेचा अर्क एखाद्या धुक्यासारखा पसरला होता…. तिला जाणवले की, खोलीत काहीतरी आले आहे…. काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुजके, शापित, अस्पW… त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती. त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला… “मी आलो आहे.” ————————————————————————————————————————– “तो दाराच्या आतच बसला होता. पणतीच्या हलत्या ज्योतीकडे पाहत होता, आधी ज्योत नुसती वेडीवाकडी फडफडत होती- पण ती थोड्याच वेळात ज्योत सावकाश सावकाश डावी-उजवीकडे वाहत्या गतीने हलायला लागली. त्या गतीत मनावर मोहिनी टाकण्याची शक्ती होती. कोठेतरी बाराचे ठोके पडत होते. ठोके मध्येच थांबले. श्वासही छातीत रुकला. वेळ- तो एक क्षण- ताणला गेला होता. समोर पणतीची एकच ज्योत नव्हती; तारांगणासारख्या असंख्य, हजारो ज्योती होत्या. त्या गोलगोल फिरत होत्या. मागच्या भिंतीचे रंग बदलत होते. अंगावरून एक गारेगार वारा जात होता. आत कोठेतरी जाणीव झाली की तो भूतकाळात विलीन झालेल्या मागच्या अशा असंख्य रात्रीचे एकावर एक पडलेले प्रक्षेप पाहत होता. एक एक अलग ज्योत अशा एकत्र येताच झगमगाट झाला होता. लहान लहान वाऱ्याच्या झुळकीचा झपाट्याने वाहणारा वारा झाला होता…आणि असं वाटत होतं की या क्षणाची, या लांबत राहिलेल्या क्षणाची कड ओलांडली की काहीतरी खोलीत येणार आहे… सुटकेसाठी ती विलक्षण धडपड! सारी हालचालच गोठली होती! फक्त निद्रव्य मन आतल्या आत तडफड करीत होतं. तो गोठलेला क्षण एखाद्या अतिप्रचंड चक्रासारखा अतिमद गतीने उलटत होता…. त्या चक्राचा तोल मध्यापुढे गेला की ते पलीकडे कोसळेल, तो क्षण उलटेल, इथे या लहानशा खोलीत अनर्थ माजेल… त्या आधीच…. त्या आधीच….”
Book cover type

You May Also Like