Skip to product information
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 300.00
Overview:
एका अशक्यप्राय, खडतर स्वप्नासाठी आपलं सबंध आयुष्य वाहून घ्यावं आणि शेवटी स्वप्नपूर्ती झाल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घ्यावा, ही तशी कविकल्पना वाटते; पण ही वस्तुस्थिती शत-प्रतिशत घडली आहे, स्वराज्यसारथी जिजाऊसाहेबांच्या जीवनामध्ये ! हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हा जिजाऊंचा श्वास. हेच त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याचा स्वप्नपूर्ती सोहळा अर्थातच शिवराज्याभिषेक ‘याची देही याची डोळा’ पाहिला आणि कृतकृत्य भावनेने अखेरचा श्वास घेतला. स्वार्थाचा लवलेशही न बाळगता जनहिताचे व्यापक उद्दिष्ट ठेवून प्राणपणाने आजन्म लढा देणाऱ्या जिजाऊंना एक नव्हे तर दोन पिढ्या घडवण्याचे श्रेय जाते. छत्रपती संभाजी महाराज यांनादेखील त्यांनी आपल्या मुशीत घडवले, म्हणूनच महाराष्ट्राला दुसरे छत्रपतीही तितकेच पराक्रमी मिळाले. दोन पिढ्या घडवण्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी धाडस, सन्मार्गावर चालणे आणि मूल्यांची शिदोरी जिजाऊ ठेवून गेल्या आहेत. या माउलींचे आपल्यावर असलेले ऋण फेडणे केवळ अशक्यच! मुलं ही राष्ट्राची संपत्ती आहे. प्रतिभावान मुलांची जडणघडण करणे हे शिक्षक आणि पालकांचे राष्ट्रकार्य आहे. प्रत्येक मुलात एक बौद्धिक क्षमता असतेच. त्या क्षमतेला ओळखून त्याला नीट प्रज्वलित करण्याचे काम पालक आणि शिक्षकांना करावयाचे असते. मुलांचे व्यक्तिमत्व फुलविण्यासाठी, त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुलांच्या समस्या कौशल्याने सोडवून त्यांना प्रोत्साहित करणे कौशल्याचे काम आहे. मुलांकडून चुका झाल्या की, त्या पुन्हा होऊ नये हे त्यांना समजावून सांगणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे याची जागरुक पालक काळजी घेतात. मुलांची बौद्धिक प्रगती जितकी महत्त्वाची आहे, त्याबरोबरच व्यावहारिक जगात वावरण्यासाठी त्याला प्रशिक्षण देणेही गरजेचे आहे, असे संस्कार प्रतिभावान मुलं घडविताना शिक्षक आणि पालक करत असतात.

Pickup currently not available