Skip to product information
Sale price
Rs. 525.00
Regular price
Rs. 700.00
Overview:
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सगळेच, त्यातल्या गफलतींवर चुकामुकींवर वैतागत असतो; पण त्यातलेच चिमुकले, गमतीचे क्षण कोणी टिपले, रंगवले तर? छोट्या-सामान्य जगण्याच्या रणरणत्या वास्तवामध्ये एखादी शीतल झुळूक येऊन गेल्यासारखं वाटेल ना? तसाच सुखद प्रत्यय पुन्हा-पुन्हा देण्यासाठी… ‘पुन्हा झुळूक’ आता साकेत प्रकाशनाच्या विद्यमाने. सुखी माणसाच्या सदऱ्याविषयी तुम्ही ऐकलं असेल. सुखी स्त्रीच्या साडीविषयी काही ऐकलं आहेत? डाऊन्स सिण्ड्रोम हा शब्द तुमच्या कानावरून गेला असेल; पण ‘सावत्र आई सिण्ड्रोम’ असू शकतो असं तुम्ही कधी मानलंय? भाषा वापरण्यात, ऐकण्यात तुमचा जन्म गेलाय; पण आज आपण फारच अनुवादित भाषा वापरतोय हे तुम्हाला जाणवलंय? रोजच्या जगण्याविषयी, रोज वापरतो त्या भाषेविषयी, रोज कानांवर पडणाऱ्या गाण्यांविषयी, नेहमीच्या वाचनातल्या पुस्तकांविषयी, हसत खेळत छोटी-मोठी भाष्यं करणारा हा ललित लेखसंग्रह तुम्ही वाचायलाच हवा. सुखी स्त्रीची साडी मिरवायला कोणाही बाईला आवडेल यात शंकाच नाही; पण सुखी स्त्रीच्या साडीचा लहरता पदर निरखायला पुरुषांना आवडणार नाही असं थोडंच आहे? वाचून तर बघा! तुम्ही बाई असाल तर पर्स वापरत असणार. आणि जेव्हा पर्स हरवेल तेव्हा काही काळ तुम्ही स्वतःच हरवल्यासारख्या होणार. पण तुम्ही पुरुष असलात तर तुम्ही पाकिट हरवू नये असं थोडंच आहे? प्रश्न बाईपणाचा, पुरुषपणाचा नाही. दैनंदिन, छोट्या, सामान्य जगण्यातल्या गमतीजमतींचा आहे. त्यांच्याकडे बघण्याच्या प्रसन्न दृष्टिकोनाचा आहे. मिश्कील शैलीत मार्मिक निरीक्षणे टिपण्याचा आहे. पर्स हरवलेली बाई मिश्कील, मार्मिक, प्रसन्न ललित लेखांचा संग्रह….

Pickup currently not available