Skip to product information
Alipta drushtikonatun | अलिप्त दृष्टिकोनातून by Sharada Sathe | शारदा साठे""
Sale price  Rs. 240.00 Regular price  Rs. 300.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
Alipta drushtikonatun | अलिप्त दृष्टिकोनातूनअर्थशास्त्र म्हणजे संभाव्यतेचे शास्त्र, पण दिसते मात्र अशक्य कोटीतल्या कालाकृतीसारखे'. अर्थशास्त्राची अशा प्रकारची व्याख्या भारताच्या प्रत्येक अर्थमंत्र्याला रुचेल आणि संवादी वाटेल. कारण त्याला दरवर्षीच आशेची जादुई किल्ली वापरण्याचे कौशल्य दाखवावे लागते. आणि सुप्रसिध्द भारतीय दोरीची जादू करावी लागते. म्हणजेच अंदाजपत्रक सादर करावे लागते. अंदाजपत्रकात मोठ्या कौशल्याने मिळकत आणि खर्च यांचा टोला काळजीपूर्वक साधलेला असतो. कराचे दर आणि करसवलती, विकास आणि सामाजिक न्याय सुधारणा आणि स्थितीवाद या सा-यांचाच तोल अर्थमंत्र्याला साधायचा असतो. या मर्यादेतसुध्दा अर्थमंत्री खूप काही उद्दिष्ट्ये साधू शकतात. पी. चिदंबरम हे एक नावाजलेले अर्थतज्ज्ञ आणि टीकाकार आहेत. त्यांच्या या लेखांमधून याचे सम्यक दर्शन आपल्याला घडते. या लेखांमधून त्यांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय आघाडी सरकारच्या २००२ ते २००४ या काळातील कारकिर्दीचे मूल्यमापन केले आहे. मूळ लेख इंग्रजीमधून 'इंडियन एक्स्प्रेस' आणि 'फायनान्शियल एक्स्प्रेस' मध्ये प्रसिद्ध झालेले होते. १९९६ ते १९९८ या काळात पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते आणि २००४ पासून ते पुन्हा अर्थमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत. त्यांनी केलेल्या स्तंभलेखनातून विविध प्रकारच्या व्यापक प्रश्नांवर निरुपण केले आहे. सदर लेखांमध्ये शेती (केवळ अन्नसुरक्षा म्हणून नव्हे तर रोजगाराचा प्रमुख स्त्रोत म्हणून), आर्थिक सुधारणा, अंदाजपत्रके, परकीय चलनाची गंगाजळी (काही वर्षांपूर्वी तिचा तुटवडा होता आणि आता प्रचंड साठा आहे आणि त्यातून नवे प्रश्न उभे राहत आहेत.), आर्थिक वाढ आणि करधोरण अशा विविध विषयांचा समावेश आहे. त्यात राजकीय घडामोडींची निरीक्षणे आणि परिशीलन आहे. सामाजिक प्रश्नांवरील परखड विचार आहेत. चिदंबरम या काळातील घटनांवर निव्वळ प्रतिक्रिया देऊन थांबत नाहीत, तर त्यांच्या लेखनातून वाचकाला भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रश्नांची अतिशय स्वच्छ, नितळ अशी समज येते. त्याचप्रमाणे राजकीय प्रश्न आणि ते सोडविण्याचे मार्ग यांचाही उमज पडतो. त्यांनी हाताळलेले सर्वच प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असून गेल्या काही वर्षांत जी आर्थिक वाढ झाली ती टिकविण्याच्या संदर्भातील कळीचे मुद्दे आपल्याला कळू शकतात. त्याचप्रमाणे हे लेख म्हणजे एका अर्थमंत्र्याने कुंपणाच्या पलीकडे बसलेल्या दुस-या अर्थमंत्र्याला दिलेली टिपणे आहेत, असेही त्यातून प्रतीत होते.
Book cover type

You May Also Like