Skip to product information
Sale price
Rs. 300.00
Regular price
Rs. 400.00
Overview:
एका अशक्यप्राय, खडतर स्वप्नासाठी आपलं सबंध आयुष्य वाहून घ्यावं आणि शेवटी स्वप्नपूर्ती झाल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घ्यावा, ही तशी कविकल्पना वाटते; पण ही वस्तुस्थिती शत-प्रतिशत घडली आहे, स्वराज्यसारथी जिजाऊसाहेबांच्या जीवनामध्ये ! हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हा जिजाऊंचा श्वास. हेच त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट होतं. जिजाऊसाहेबांनी स्वराज्याचा स्वप्नपूर्ती सोहळा अर्थातच शिवराज्याभिषेक ‘याची देही याची डोळा’ पाहिला आणि कृतकृत्य भावनेने अखेरचा श्वास घेतला. स्वार्थाचा लवलेशही न बाळगता जनहिताचे व्यापक उद्दिष्ट ठेवून प्राणपणाने आजन्म लढा देणाऱ्या जिजाऊंना एक नव्हे तर दोन पिढ्या घडवण्याचे श्रेय जाते. छत्रपती संभाजी महाराज यांनादेखील त्यांनी आपल्या मुशीत घडवले, म्हणूनच महाराष्ट्राला दुसरे छत्रपतीही तितकेच पराक्रमी मिळाले. दोन पिढ्या घडवण्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी धाडस, सन्मार्गावर चालणे आणि मूल्यांची शिदोरी जिजाऊ ठेवून गेल्या आहेत. या माउलींचे आपल्यावर असलेले ऋण फेडणे केवळ अशक्यच! गर्भवतीसाठी संपूर्ण मार्गदर्शन’ असं या पुस्तकाचं शीर्षक असलं तरी ‘बाळाचा जन्म’ या माणसाच्या आयुष्यातील सर्वस्पर्शी अनुभवाभोवती करण्यात आलेली या पुस्तकातील मांडणी आईसह बाळाचे वडील, आजी-आजोबा यांचीही ‘बाळ जन्मा’च्या विविध टप्प्यांवरची भूमिका नेमकेपणाने स्पष्ट करते. तक्ते, चित्र यांच्या मदतीने शास्त्रीय माहिती देणारं हे पुस्तक ‘बाळा’च्या आगमनाची तयारी साऱ्या कुटुंबांनी कशी करावी, हे सांगणारी कार्यपुस्तिका आणि जगण्याबद्दलचे शिक्षण देणारी मार्गदर्शिकाही आहे. बाळाच्या आईबरोबरच कुटुंबीयांच्या मनातील अनेक संभाव्य प्रश्नांची उत्तरं मिळतानाच, गैरसमज दूर करणारं आणि जीवनकौशल्य विकसित करण्यास साहाय्यक ठरू शकेल, असं हे वैद्यकीय-तज्ज्ञांचं पुस्तक कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं वाचावं असंच आहे. संपूर्ण पुस्तकात सकारात्मकतेचा एक अंतःप्रवाह वाहत असतो. गर्भावस्थेसाठी योगासने, आहार, संगीत या साऱ्यांचं महत्त्व सांगतानाच, प्राथनेशी त्याचं नातं जोडणं, हे एकाअर्थी सृष्टी आरंभाशी, मानव जन्माशी नातं जोडण्यासारखं आहे. मर्ढेकरांसारखा युगप्रवर्तक कवी लिहितो- “पोरसवदा होतीस कालपरवापावेतो थांब उद्यांचे माऊली तीर्थ पायांचे घेईतो” तुमच्या-आमच्या मनातही ‘मातृ-देवते’बद्दल अशीच भावना असते ना? – संजय आर्वीकर

Pickup currently not available