Skip to product information
Talghar | Kaat by Narayan Dharap avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 356.25 Regular price  Rs. 475.00
Overview:
“रात्री केव्हातरी खूप उशिरा तिला झोप लागली होती. सकाळी जाग आली तेव्हा डोळे चुरचुरत होते. जिभेवर एखादी कडवट चव रेंगाळावी तसं काहीतरी वाईट झाल्याची भावना मनात होती. काल रात्री मनाने खूप निर्धाराचा पवित्रा घेतला होता; पण वाळूतला किल्लाच तो! एका भरतीबरोबर भुईसपाट झाला होता. मनाला आलेला विफलपणा, पुढच्या आयुष्यातला एकटेपणा हे सगळं तिला सहन होणार होतं का? इतकी वर्षं ती शिणली, कष्टली… हाती काय काय राहिलं होतं? सागराचं पाणी ओंजळीतून गळून जावं तशी सर्व नाती गळून गेली होती. शेवटी शेवटी ती एकटी, ती एकटीच राहिली होती. निष्काम कर्म- उच्चारायला शब्द फार सोपे; पण आचरणात महाकठीण. वेळेचं चक्र घरंगळत चाललंच होतं. आयुष्यातून कोणालाच सुटका नव्हती. मनासारखं होत असलं म्हणजे दिवसांची यादच राहत नाही. आणि असं काही विपरीत घडलं की, क्षणाक्षणाचा बोजा असह्य होतो. एकटीचे हात तर अति दुर्बल होतात. एकेका क्षणाचं हे वजन, मग सेकंदाचे तास, तासांचे दिवस, दिवसांची वर्ष… ती अजस्र रास पाहूनच जीव दडपून जातो. असं वाटतं या रात्रीखाली शरीर पिंजून जाणार आहे… त्याचा चेंदामेंदा होऊन जाणार आहे.” ————————————————————————————————————————– “ती जागी झाली होती. कशाने, तिला माहीत नव्हते. पण मनाला कोणत्या तरी खोलवरच्या पातळीवर धोक्याचा इशारा मिळाला असला पाहिजे. कारण तिच्या सर्व चित्तवृत्ती अत्यंत तीक्ष्णतेने आसपासच्या परिस्थितीचा वेध घेत होत्या. तीच ती चांदण्याने उजळलेली रात्र, तेच ते चंदेरी किरण… पण आता सर्वत्र एक निश्चलता होती-मोठी विलक्षण निश्चलता होती. वारा अजिबात पडला होता. झाडांचे एक पानही हलत नव्हते, ती सळसळत नव्हती- रातकिड्यांची किरकिर नव्हती-काहीही नव्हते. विलक्षण शांतता. हालचाल नाही. उघड्या खिडकीकडे पाहता पाहता तिला वाटले, हा खरा देखावा नाहीच, हे एक चित्र आहे-आपण खिडकीजवळ गेलो तर हाताला चित्रच लागेल. सर्व शरीर गारठून बधिर झाल्यासारखे वाटत होते. तिने हात उचलला, तो गालावर, कपाळावर, मानेपाशी धरला-पण हात आणि गाल दोन्ही बर्फासारखे गार होते…. जणू उष्णता, ऊब या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या…. कधी कधी शरीराला ऊबच मिळाली नव्हती….आणि या गारठविणाऱ्या भीतीतून मनाला तो स्पर्श झाला…. उदासवाणी, घाणेरडी जागा सासूबाईंच्या जाऊबाई म्हणाल्या होत्या…. आणि आता तिच्या आसपास तो तीव्र, तिखट, दुष्टतेचा अर्क एखाद्या धुक्यासारखा पसरला होता…. तिला जाणवले की, खोलीत काहीतरी आले आहे…. काहीतरी दुष्ट, विकृत, पापी, सडके, कुजके, शापित, अस्पW… त्या अतीव दुष्टतेच्या गाभ्यात एक अघोरी चेतना होती. त्या विकृतीच्या गर्भातून एक आवाज पुटपुटत आला… “मी आलो आहे.”
Book cover type

You May Also Like