Skip to product information
Sale price
Rs. 262.50
Regular price
Rs. 350.00
Author:
Goswami Tulsidas, Mahesh Sharma
Pages:
-
Publisher:
साकेत प्रकाशन | Saket Prakashan
Language:
Marathi
Overview:
गोस्वामी तुलसीदासांनी ‘रामचरितमानस’ रचण्यास सुरुवात केली आणि तब्बल दोन वर्षे, सात महिने आणि 26 दिवसांनी म्हणजे रामविवाहाच्या दिवशीच ‘रामचरितमानस’ लिहून पूर्ण झाले. जगाला साहित्यातील सर्व रस असलेला हा अद्भुत ग्रंथ लाभला. त्यातील भाषासौंदर्याने हा ग्रंथ उजळून निघाला. ‘रामचरितमानस’मधील अनेक दोहे हे सहजपणे आजही ओठांवर येत असतात. रामायणाचे निरूपण करताना अगदी सोप्या भाषेत तुलसीदासांनी भारतीय जीवनपद्धतीची व्याख्याच जणू लोकप्रिय केली. गोस्वामी तुलसीदासरचित ‘रामचरितमानस’चे कथानक हे महर्षी वाल्मीकी यांच्या ‘रामायण’ या रचनेवर आधारित आहे. ‘रामचरितमानस’ची सात कांडांत (अध्याय) विभागणी केली गेली आहे. ‘सुंदरकांड’ हा ‘रामचरितमानस’चा एक प्रमुख अध्याय आहे. महर्षी वाल्मीकीरचित संस्कृत रामायणाचे अवधी भाषेत रूपांतर करून हा ग्रंथ रचला गेला असून, हा अध्याय आपल्या मायबोलीत या पुस्तकरूपाने आपल्यासमोर आलाय. ‘सुंदरकांड’ अतिशय रसपूर्ण आणि मोहक आहे, ज्यामध्ये हनुमंतांची स्तुती करताना त्यांच्या लीला, पराक्रम, प्रतिमा विश्लेषण, घटनांची सुरेख गुंफण, चपखल शब्दांत दोहे आणि चौपाईच्या माध्यमातून आपल्यासमोर येतात. हनुमंतांचे लीलावर्णन एवढंच साध्य न ठेवता यामध्ये ज्ञान, कर्म, नीती-अनीती आणि भक्तीचीही प्रचीती येते. हा अनुवाद वाचकांना नक्कीच भावयुक्त भक्तीची – आनंदाची अनुभूती देणारा आहे. ————————————————————————————————————————– आचार्य चाणक्यांनी आयुष्यभर जे जे म्हणून केलं, ते इतिहास बनलं; जे जे कथन केलं, ते सुभाषित बनलं. सुमारे 2300वर्षांपूर्वीचे त्यांचे बोल, त्यांचे विचार त्याकाळी जेवढे कालसुसंगत होते तेवढेच ते आजदेखील आहेत. त्यांचा एक-एक शब्द अनुभवांच्या कसोटीवर पारखून घेतलेल्या शुद्ध बावनकशी सोन्याप्रमाणे आहे. त्यांनी सांगितलेल्या सिद्धांतांना प्रत्येक व्यक्तीनं तसेच राष्ट्रानं आजच्या काळात काही प्रमाणात जरी आचरणात आणलं तर ती व्यक्ती, ते राष्ट्र महान अग्रणी आणि अनुकरणीय म्हणून उदयाला येईल हे निश्चित. या पुस्तकात व्यक्तिमत्त्वविकास, धर्मसंस्था, कुटुंबसंस्था, अर्थसंस्था आणि राज्यसंस्था याविषयी चाणक्यांनी केलेलं मौलिक मार्गदर्शन असून ते म्हणजे आदर्श व सुखी जीवन जगण्याची गुरुकिल्लीच आहे. त्याद्वारे वाचकांना जीवन जगण्याची कला अवगत होईल यात शंका नाही.

Pickup currently not available