Skip to product information
Satyacha Shodh | Path Pradeep by osho avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 262.50 Regular price  Rs. 350.00
Author: osho
Pages: -
Language: Marathi
Overview:
सत्य असले तर स्वत:च्या आतमध्ये आहे. त्यामुळे इतर कोणाकडे मागून ते मिळणार नाही. सत्य कुठून शिकूनही घेता येत नाही. कारण आपण जे काही शिकत असतो ते बाहेरून शिकत असतो. आपण जे मागत असतो ते बाहेरून मागत असतो. सत्याला वाचूनही समजून घेता येत नाही. कारण आपण जे काही वाचतो ते बाहेरून वाचत असतो. सत्य असते आपल्या अंतरंगात- ना त्याला वाचायचे आहे ना मागायचे आहे, ना कोणाकडून शिकायचे आहे – त्याला खोदून काढायचे आहे. त्या जमिनीला खोदायचे आहे, जिथे आपण उभे आहोत, तर ते खजिने प्राप्त होतील, जे सत्याचे खजिने आहेत. – ओशो ओशो पुस्तकातील काही मुख्य विषय • खरी, वास्तविक स्वतंत्रता काय आहे? • शून्य हे पूर्णत्वाचे द्वार आहे. • जीवन एक स्वप्न आहे का? • संयमाचा अर्थ काय? ————————————————————————————————————————- या जगात स्वतःपलीकडे कशाचीच प्राप्ती खरी नव्हे. हे लक्षात ठेवा. जे स्वतःला शोधतात, त्यांनाच खरी प्राप्ती होते आणि जे इतरही काही शोधीत राहतात, त्यांच्या हाती शेवटी अपयश आणि दुःखच येते. वासनेच्या मागे धावणारे लोक नष्ट झाले आहेत, नष्ट होत आहेत आणि नष्ट होतील. तो मार्ग आत्मनाशाचा होय. वासनेची तृप्ती कधीच होत नाही. तिच्या मागे जितके धावावे, तितकी अतृप्ती वाढतच जाते. जेव्हा व्यक्ती मागे वळून पाहते आणि स्वतःत प्रवेश करते, तेव्हाच ती वासनेतून मुक्त होऊ शकते.
Book cover type

You May Also Like