Skip to product information
Sara Kahi Mulansathi | Priy Aai-Baba Combo by Shobha Bhagwat, Dr. Susheel Surve avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 262.50 Regular price  Rs. 350.00
Overview:
मानसशास्त्रीय उपबोधन (Counselling) करताना अनेक पालकांच्या आपल्या पाल्याविषयींच्या तक्रारी ऐकायला मिळत. या तक्रारींच्या मुळशी जे गैरसमज (Misunderstanding) असत ते दूर करण्यासाठी किशोरांच्या अपेक्षा आईबाबांपर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं. या कार्याची प्रेरणा रिआन् हॉलडे आणि त्याचे अमेरिकन मित्र (11 ते 12 वर्षे वयोगटातले) यांच्या प्रयत्नांतून मिळाली. मराठीतील त्याच वयोगटांतल्या मुलामुलींनी भरघोस प्रतिसाद दिला. त्यातून महाराष्ट्रीय किशोरांच्या अपेक्षांचा हा संग्रह तयार झाला. तो ‘आईबाबा’ पर्यंत पोहोचावा हीच अपेक्षा. – डॉ. सुशील सुर्वे ————————————————————————————————————————– आज पालकांच्या जगण्यातले ताण-तणाव मुलांमध्ये आपसूक झिरपत आहेत. पालक जिंकण्यासाठी धावत सुटले आहेत आणि बाहेरची प्रस्थापित व्यवस्था याला मदत करते आहे. अशा वातावरणात मुलाचं ‘मूलपण’ सांभाळण्याचं, जोपासण्याचं, फुलवण्याचं काम जीव तोडून कसं करायचं ते सांगण्याचा प्रयत्न म्हणजे प्रस्तुत पुस्तक होय. कामातला आनंद, खेळातली मजा, कष्टांचा अनुभव, निर्मितीसाठी गंमत, नात्यांची ऊब, क्वालिटी टाइम, निसर्गाशी नातं, जगण्याचा आत्मविश्वास आणि या सगळ्यांतून मुलांच्या हाती सहज लागणारी ‘मूल्यं’ या सर्वांचा हा प्रवास आहे. आपण पालक मुलांना कधी ही पाच वाक्यं लक्षात ठेवून सांगतो का? त् माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त् माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. त् तू हे किती छान केलंस. त् तुझं मत मला महत्त्वाचं वाटतं. त् सॉरी बरं का! माझ्या लक्षातच नाही आलं. पालकत्व हे शास्त्र आहे, कला आहे आणि सतत करत राहण्याचा, आनंदाचा अभ्यास आहे! तेव्हा पालकांनो, मुलांसाठी सारं काही करताना सोबतच हेही करा.
Book cover type

You May Also Like