Skip to product information
Sant Tukaram | Shree Sant Gadgemaharaj | Sant Kabir by Krishnarao Arjun Keluskar, Madhukar Keche, Vidyadhar Sadavarte avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 480.00
Overview:
तुकारामबावांचे चरित्र संत तुकाराम महाराज अर्थात तुकारामबाबांचे चरित्र हे गुरुवर्य केळूसकरांनी लिहिलेले मराठीतील गद्य रूपातील पहिले विस्तृत चरित्र आहे. १८९६ साली हा ग्रंथ प्रथम प्रकाशित झाला. यानंतर आता १२० वर्षांनी तो प्रथमच पुनर्प्रकाशित होत आहे. संत चरित्रे कशी लिहावीत, हे केळूसकरांनी महाराष्ट्रास प्रथमच दाखविले आहे. सत्यनिष्ठा, चिकित्सा व माहिती पडताळून पाहणे हे या पहिल्या तुकाराम चरित्राचे वैशिष्ट्य आहे. हे लिहिताना जितका भाग ऐतिहासिक ब खरा भासला तेवढाच येथे घेतला. महाराष्ट्राचे महान संत तुकाराम महाराज यांचे मराठीतील पहिले चरित्र वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत. ———————————————————————————————————————- भारतीय साहित्याच्या हजार वर्षांच्या इतिहास संत कबीर कवी म्हणून सर्वांना परिचित आहेत. कबीर जे काही सांगत त्याला अनुभवाचा आधार होता. म्हणूनच त्यांची वाणी मनाचा ठाव घेणारी आणि दोषांवर आघात करणारी होती. या पुस्तकात कबीरांच्या जीवन चरित्राबरोबर त्यांच्याशी संबंधित ऐतिहासिक तसेच प्रचलित घटनांबद्दल माहिती देण्यात आली आहे. तसेच कबीरांचे तत्त्वज्ञान रसपूर्ण आणि सोप्या भाषेत समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. कबीरांच्या प्रसिद्ध आणि प्रचलित साखियांचा अर्थ इथे दिला आहे. कबीरांचे जीवनकार्य आणि त्यांची शिकवण सांगितली आहे. ———————————————————————————————————————— श्री संत गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील अलौकिक विभूतिमत्त्व होते. सामान्य कुळात जन्मलेल्या या पुरुषाने आपल्या अनुभूतीतून अंत:करणाची केवढी उंची गाठली हे पाहिले म्हणजे अंत:करण आश्चर्यमूढ होते. त्यांचे सर्व कर्तृत्व त्यांच्या जीवनातून साकारलेले आहे. गाडगेबाबांचा आदर्श आजच्या स्वार्थाने बरबटलेल्या समाजाला उत्तम मार्गदर्शक असे आहे. इतके त्यागमय, नि:स्वार्थ, सेवाभावी जीवन सापडणे दुर्मिळ अशा या अलौकिक महापुरुषाच्या जीवनाने वाचकांच्या मनात नवीन प्रेरणा उत्पन्न होईल व आपले एक जीवन उत्पन्न करण्याची स्फूर्ती त्यांना मिळेल, हाच चरित्रग्रंथाचा मुख्य हेतू आहे.
Book cover type

You May Also Like