Skip to product information
Swatantryaveer Savarkar | Swami Vivekanand by Shankar Karhade, Rajiv Ranjan avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 243.75 Regular price  Rs. 325.00
Overview:
‘काळ्या पाण्या’ची शिक्षा म्हटलं की, आपल्याला सर्वप्रथम आठवतात ते ‘स्वातंत्र्यवीर सावरकर.’ “तुजसाठी मरण ते जनन, तुजविन जनन ते मरण तुज सकल चराचर शरण, चराचर शरण” अशा शब्दांत स्वातंत्र्याचे गुणगान करणार्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्या यातना सहन केल्या, जे बलिदान दिले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. ते एक महान देशभक्त, साहित्यिक व कवी आणि समाजसुधारक होते. सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी ‘मित्रमेळा अर्थात अभिनव भारत’ची स्थापना केली. ‘अखंड, एकात्म हिंदुस्थान’ अशी त्यांची ठाम भूमिका होती. राष्ट्रभक्तीने भारावलेल्या या महान क्रांतिकारकाचे बालपण ते स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग हा प्रवास प्रस्तुत पुस्तकाद्वारे गोष्टींच्या स्वरूपातून मांडण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन भावी काळात आदर्श नागरिक निर्माण व्हावेत या हेतूने लिहिलेले ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हे पुस्तक वाचकांना नक्कीच आवडेल, अशी आशा आहे. ————————————————————————————————————————- हिंदू धर्माला भारतात पुनर्जीवित करणारे आणि हिंदू धर्माचे थोरपण जगभर समजावून सांगणारे थोर विचारवंत आणि संत म्हणून विवेकानंदांचे कार्य सर्वांना माहीतच आहे. विश्वधर्म समेलनात त्यांनी विश्वबंधुत्वाची भूमिका मांडली. खरं तर स्वामी विवेकानंद यांना हिंदू धर्माइतकी किंवा त्याहून काकणभर अधिक भारताच्या विकासाची तळमळ होती. त्यांना नवा भारत घडवायचा होता आणि केवळ त्यासाठी त्यांनी भारतभ्रमण केले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत फिरताना त्यांनी सामान्य माणसातील स्वाभिमान आणि ‘स्व जागृत करण्याचा प्रयत्न केला. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याचे आंदोलन देशभर पेटले; कारण त्यासाठी अनुकूल मनोभमी विवेकानंदांच्या विचारांनी आधीच तयार करून ठेवली होती. गुरूदेव रवींद्रनाथ टागोर विवेकानंदांचे महत्त्व सांगताना म्हणतात, ‘‘तुम्हाला भारत माहीत करून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. सर्व विवेकानंद सकारात्मक आहेत, त्यांच्यात नकारात्मक असे काहीही नाही,’’ स्वामीजींना सामान्य माणसांविषयी तळमळ होती. सामान्य माणूस हाच त्यांच्या धर्म आणि विकास या संकल्पनेच्या केंद्रस्थानी होता. स्वामीजींसारखा संत आपल्या विचारांच्या माध्यमातून किती मोठे परिवर्तन घडवू शकतो हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चरित्र वाचायला हवेच. सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य असलेले प्रेरणादायी चरित्र: ‘स्वामी विवेकानंद’.
Book cover type

You May Also Like