Skip to product information
आजच्या धर्माची गोष्ट | Aajchya Dharmachi Goshta by Baba Bhand avilable at The Pustakwala store
Rs. 98.00
Overview:
भारतात राहणारे आपण सगळे भारतीय आहोत. देशभरात सर्व जाती-धर्मांची माणसं राहतात. मातीवर राहणारे आपण सगळे इथली माणसं आहोत. इथं राहणार्‍या सगळ्यांचा एकच धर्म-माणुसकीचा.माणुसकीतूनच सर्वांसाठी मानवता धर्मच सांभाळत असतो. माणसांनी जनावरांसारखं वागू नये. माणसं जनावरासारखी वागू लागली की,त्यांच्या अंगात सैतान शिरतो. अशा संकटात माणसानंच देव, अल्ला बनून मदतीला धावून यावं. माणसानं सैतानाला आवरावं. हे माणसाचं माणसांशी चांगलं वागणं होय. माणूस चांगला वागू लागला की मानवता धर्माचं बळ वाढतं. जात-पात-धर्मांच्या भिंती संपून जातात. सर्वधर्म समभाव उरतो. हाच सगळ्यांचा भारतधर्म आहे.भारताने माणूसधर्म जपला तर स्वार्थ अन् पापाला गळती लागेल.पापाला वर स्वर्गात शिक्षा नाही. सगळं इथंच आहे. सगळे देव-अल्ला हेच सांगून गेले – ‘इथंच करा अन् इथंच फेडा.’चूक झाली, दुरुस्त करा. पुन्हा होणार नाही याची काळजी घ्या. माणसानं माणसाशी वागताना मानव धर्माची संगत जोडावी. हीच आजच्या धर्माची गोष्ट आहे.
Book cover type

You May Also Like