Skip to product information
Aarogyavhya Gujgoshti | आरोग्याच्या गुजगोष्टी By Malati Karwarkar | मालती कारवारकर
Sale price  Rs. 180.00 Regular price  Rs. 200.00
Pages: 157
Language: Marathi

तुमच्यातून तुमचा आहार डोकावतो
जिथे जीव आहे, तिथे अन्नाची गरज असते. पण हे अन्न उदरभरणासाठी नसावं, तर अशा अन्नामुळे शरीराची योग्य ती उभारणी व्हावी, हा हेतूही पुरा व्हावा अशी अपेक्षा असते. शास्त्रज्ञांनी प्रयोगांती असे अन्नपदार्थ निश्चित केले आणि त्यांच्या गुणधर्मानुसार एका विशिष्ट पद्धतीत मांडण्याचं कामही केलं.
या विशिष्ट पद्धतीला 'डाएट' असं म्हणतात. पण त्याचा शास्त्रीय अभ्यास न केल्यास त्यांतले पदार्थ कसेही, कधीही आणि कितीही खाल्ले जातात आणि इतरांनाही दिले जातात. असं करण्यामुळे आज 'डाएट' च्या भुलभुलैय्याचे अनेक प्रकार प्रचारात आले आहेत.
असं होऊ नये, असं वाटत असल्यास या पुस्तकात 'डाएट'चा एक शास्त्रशुद्ध आराखडा दिला आहे. त्यासोबत योग्य त्या टीका-टिप्पणीही देण्यात आल्या आहेत. त्याचा अभ्यास करावा आणि दैनंदिन वापरही करावा. अशा वापरामुळे दोन हेतू साध्य होतात -
१) शरीराला हवी असणारी ऊर्जा अथक मिळते. शरीराचं तापमान योग्य तेवढं राखलं जातं.
२) शरीराची योग्य ती बांधणी आणि वाढ होते. कुरबुरी नाहीशा होऊन शाश्वत आरोग्य मिळतं. अशा रीतीनं मिळालेल्या ऊर्जेला दोन प्रकारांत ओळखतात.
१) कॅलरी ऊर्जा : हिचं मोजमाप करता येतं.
२) जैविक ऊर्जा : ही शरीराच्या आत तयार होते. म्हणून तिचं मोजमाप करता येत नाही.
या ऊर्जेला 'एटीपी' (अॅडिनोसाईन ट्राय फॉस्फेट) ऊर्जा म्हणून ओळखतात.
आपले सर्व पारंपरिक खाद्यपदार्थ वरील प्रकारच्या दोन्ही ऊर्जा देतात. म्हणून त्यांना सकस म्हणतात. असा आहार घेणाऱ्याच्या शरीरातून तो डोकावतोच डोकावतो.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Aarogyavhya Gujgoshti | आरोग्याच्या गुजगोष्टी By Malati Karwarkar | मालती कारवारकर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like