Skip to product information
आठवांचे झेले | Aathvanche Zele by Laxmikamal Gedam
Sale price  Rs. 127.50 Regular price  Rs. 170.00
Pages: -
Language: Marathi
Overview:
लक्ष्मीकमल गेडाम यांनी बहुविध वाङ्‌मय-प्रकारात विपुल लेखन केले असले तरी ललित-लेखन हा त्यांचा आवडता वाङ्‌मय-प्रकार आहे. तो त्यांच्या स्वभावाशी, अनुभवाशी, निरीक्षणशक्तीशी जुळणारा तर आहेच, पण त्यात त्यांची चिंतनशील वृत्ती प्रगट होते. यासाठी आवश्यक असणारी संवेदनशील वृत्ती व प्रतिभा त्यांच्याकडे आहे. माणसांविषयीचे प्रेम व त्यांची जीवनविषयीची आस्था यामुळे या लेखांना भावात्म मूल्य प्राप्त झाले आहे. लेखिकेच्या सुहृदयी वृत्तीचे, संस्कारसंपन्नतेचे आणि सुसंस्कृतपणाचे एक लोभस दर्शन ह्या लेखांतून होते. रूढी-परंपरांचा जाणीवपूर्वक घेतलेला शोध, डोळस वृत्तीने लोक-परंपरा व लोकसंस्कृतीचा लावलेला अन्वयार्थ व त्यातही विशेषतः प्रकटणारे स्त्री-मन व स्त्री-जीवन गेडाम यांच्या लेखनातून पाझरते. हा ओलेपणा ह्या लेखांना असल्यामुळेच साध्या, सरळ व ओघवत्या भाषेत हे लेख उतरले आहेत. हे ‘आठवांचे झेले’ म्हणूनच अधिक सुगंधित झाले आहेत.
Book cover type

You May Also Like