वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील कडू-गोड प्रसंगांचा गोफ... गिरणगावातील बालपणापासून ते गिरगावातील तरुणपणापर्यंतचा प्रवास... लॉटरीची तिकिटे विकण्यापासून ते ग्रंथ प्रकाशनापर्यंतची व्यावसायिक कारकीर्द... बदललेल्या मुद्रणकलेपासून ते जुळलेल्या न जुळलेल्या पत्रिकेपर्यंतचे किस्से... सोसायटीतल्या सख्खे शेजारींपासून ते दुकानात येणाऱ्या ग्राहकांपर्यंतचे विविध नमुने...
आस्तिक-नास्तिकतेपासून ते माणसातल्या हरवलेल्या माणुसकीपर्यंतची निरीक्षणे जगताना आलेले बहुरंगी अनुभव तटस्थ रसाळपणे मांडणाऱ्या ललित लेखांचं जाळीदार पिंपळपान म्हणजे आठवणींची साठवण.
गेली चारं दशकं ग्रंथ प्रकाशन, ग्रंथ विक्री, संपादन आणि विविध साहित्यिक उपक्रमांचं सातत्यपूर्ण आयोजन यात अग्रेसर असलेल्या 'मॅजेस्टिक' अशोक केशवराव कोठावळे यांची ही 'आठवणींची साठवण' त्यांची एक वेगळी ओळख वाचकांना करून देईल. हे पुस्तक वाचताना तुमच्या मनातला आठवणींचा गोफही अलगद उलगडेल...
Pickup available at HO
Usually ready in 24 hours