Skip to product information
Shyamchi Aai | Akbar Birbalachya Majedar Goshti by Sane Guruji, Ravindra Kolhe avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 230.00 Regular price  Rs. 255.00

१९५०-६० च्या दशकात ज्या पिढीने जीवनातील पहिले एक दीड दशक पूर्ण केले होते, असा आजचा एकही ज्येष्ठ नागरिक नसेल की ज्याने त्याच्या बालपणी साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचले नसेल. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’, ‘मीरी’ अशा कादंबऱ्या वाचून ज्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या नसतील अशी व्यक्ती विरळच. अत्यंत साधी, सरळ; पण काळजाचा ठाव घेणारी हृदयस्पर्शी भाषा हे गुरुजींच्या लिखाणाचे वैशिष्ट्य. आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र म्हणजे ‘श्यामची आई’ असे म्हणता येईल. खुद्द गुरुजी म्हणतात की, “ही कथा लिहिताना हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे.

या गोष्टी लिहीत असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते. हृदय गहिवरून व उचंबळून आले होते. माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना ‘श्यामची आई’ वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल. आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी; पण हे संस्कार उपदेशाच्या डोसाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत:च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्याछोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श ‘आई’ आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल, हे निश्चित. ————————————————————————————————————————- प्राचीन काळापासून अकबर-बिरबलाच्या कथा मुलांचे मनोरंजन करत आल्या आहेत.

खळखळून हसवणाऱ्या या कथा मुलांची तार्किक शक्ती वाढवून बुद्धीला चालना देतात. बिरबलाचे हजरजबाबीपणा, न्यायप्रियता, दुर्बलांना मदत करणे या गुणांबरोबरच केव्हा कसे वागावे हेही शिकवतात. त्याबरोबरच मुलांना बिरबलासारखे बुद्धिमान बनवण्यासाठी गोष्टीनंतर मार्गदर्शन केले आहे. असा हा ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना असलेल्या कथा प्रत्येक मुलाच्या संग्रही असायलाच पाहिजे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Shyamchi Aai | Akbar Birbalachya Majedar Goshti

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like