मा. अ.करीम अ. मजिद सालार सर यांनी जळगावातील उर्दू माध्यमातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व पदवीपर्यंतच्या एकूण १५ शाखांचा विस्तार केला. त्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे संगोपण व संवर्धन करणे, आमदारकी, खासदारकी नसतांना स्वयंप्रेरणेने ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणे, वाटते तितके सोपे नाही. तसेच सर हे समाजातील गरजू गरीब निराधारांसाठी सर म्हणजे एक मायाळू सावलीच वटवृक्ष आहेत. सर नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. बेरोजगारांना लघुउद्योग धंद्यासाठी मदत करीत राहणे, धर्मठ, कर्मठ वातावरणात दोन धर्मात व सर्वात प्रेम-सलोखा कसा टिकून राहील त्यासाठी अहोरात्र झटणार व्यक्तिमत्त्व म्हणजेच सालार सर. शब्दांपलिकडेच व शब्दांत न मावणारे म्हणजेच करीम सालार सर होय. - एस. अमन
Pickup available at HO
Usually ready in 24 hours