Skip to product information
Overview:
‘अंग देशातलं नवल’ ही वय वर्षं 10 ते 15 वयोगटातल्या मुलांसाठी खास पुस्तकमालिका आहे. मेंदू, जनुकं, रक्त, रोगप्रतिकार क्षमता हे आपल्या शरीरातले अतिशय महत्त्वाचे घटक. मानवी शरीराच्या राज्यात या घटकांची रचना कशी असते? ही यंत्रणा नेमकी कशी काम करते? या सगळ्याविषयी अतिशय महत्त्वाची, नवलाची, शास्त्रीय माहिती देणारी ही पुस्तकमालिका! ही पुस्तकं वाचून मुलांना काय मिळेल? आपलं शरीर व शरीरांतर्गत कार्याची सविस्तर माहिती मुलांना मिळेल. अतिशय रंजक भाषा आणि रंगीत चित्रांच्या सुरेख, आकर्षक मांडणीमुळे मुलांना विषयाची सखोल माहिती तर होईलच, शिवाय शरीरविज्ञान समजून घेण्याचं कुतूहल जागं होईल. या पुस्तकमालिकेचा उपयोग मुलांना शालेय उपक्रमासाठीसुद्धा करता येईल. मुलांना शास्त्रीय पद्धतीने एखाद्या विषयाची मांडणी करण्याची सवय लागेल. ‘अंग देशातलं नवल’ ही अशी दर्जेदार, संग्राह्य, वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकमालिका ठरेल. पालकांसाठी, शिक्षकांसाठीही विषय अधिक चांगल्या पद्धतीने शिकवण्यासाठी ही मालिका उपयुक्त ठरेल.

Pickup currently not available