Skip to product information
अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान म्हणजे असे शास्त्र की ज्यामध्ये अन्नाच्या सुरक्षित पौष्टिक गुणधर्मांचे जतन, प्रक्रिया, हवा बंद करणे, वितरण यांचा अभ्यास केला जातो. अन्न उद्योग हा एक मोठा व्यवसाय उदयास येत आहे. अन्न उद्योगामध्ये धान्ये, बिया, फळे, भाजीपाला, खोड, मूळ, पाने, कळ्या, फुले इत्यादी वनस्पती भागाचा उपयोग केला जातो. फळे आणि भाजीपाला उत्पादनात चीन नंतर भारत हा जगातील दुसर्या क्रमांकाचा देश आहे. १९८० पासून फळे आणि भाज्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार झपाट्याने वाढला आहे. अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञानामुळे, जगाच्या वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवठा करण्यासाठी, अन्न उद्योगात भविष्यात खूप मोठी अशी संधी निर्माण झालेली आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours