आरोग्याचा विचार करत असताना केवळ शरीराचे आरोग्य न बघता मनाचे व आत्म्याचे आरोग्य तसेच आरोग्याला जोडून असलेले योग, ध्यान, धारणा वगैरे विषयांसंबंधित सुभाषिते पण ह्यात समाविष्ट आहेत आयुर्वेदातील एखादा अवघड विषय एका सूत्ररूपाने श्लोकात दिलेला असल्याने अशा सुभाषितांचा आयुर्वेदाच्या अभ्यासकांना तर उपयोग होईलच पण सामान्यांनाही बोध घेता येईल. ही सर्व सुभाषिते संतवचने, आयुर्वेदिक व इतर ग्रंथांतून तसेच नेहमी कानावर पडणारी संग्रहित करून घेतलेली आहेत.
त्यांचा सरळ अर्थ नेहमीचाच असला तरी सुभाषितामागील गूढार्थ संकल्पना हे सौ. वीणाताईचे विशेषत्व.!! रोजच्या जीवनासाठी उपयोगी पडणारे नियम, तत्त्वे ज्या श्लोकांमध्ये समजावलेली आहेत अशा श्लोकांचा संग्रह.
मूळचा संस्कृत श्लोक, अर्थ व विवरण यात समाविष्ट केलेले आहे. सहज पाठांतरासाठी व लक्षात राहण्यासारखे श्लोक हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours