भारतीय मानसशास्त्र हे केवळ भारतीय लोकांचे मानसशास्त्र नव्हे, तर ते भारतीय उपखंडात हजारो वर्षांपासून विकसित झालेल्या मानसशास्त्रीय कल्पना आणि पद्धतींचा संदर्भ स्पष्ट करते. भारतीय मानसशास्त्रात प्राचीन तत्त्वज्ञान, आध्यात्मिक व लौकिक परंपरा, भारतीय धर्मग्रंथांमधील शिकवण, योग व ध्यानधारणा इत्यादी समग्र गोष्टींचा समावेश होतो. प्रस्तुत पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात भारतीय मानसशास्त्राचा इतिहास, भारतीय मानसशास्त्राचे विविध दृष्टिकोन, पौर्वात्य व पाश्चिमात्य मानसशास्त्रविषयक व्यक्तिमत्त्वाचे दृष्टिकोन इत्यादी योग्य माहिती देण्यात आली आहे. दुसरे प्रकरण हे वेद, उपनिषद, सांख्य तत्वज्ञान, बौद्ध व जैन धर्म यातील मानसशास्त्र विषयक ज्ञान प्राप्त करून देते. या प्रकरणात पतंजलीच्या योगसूत्रांचा तसेच अभिधम्म सिद्धांताचा विशेष उल्लेख आहे. तिसरे प्रकरण हे भारतीय मानसशास्त्र आरोग्यासाठी कसे उपयुक्त आहे याविषयी असून त्याचे विवेचन अगदी सोप्या भाषेत करण्यात आले आहे. चौथ्या प्रकरणाचा गाभा हा भारतीय मानसशास्त्राचा अभ्यास आधुनिक भारतात कसा सुरू झाला आणि भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन या संस्थेने प्रकाशित केलेल्या पाच सर्वेक्षणाशी संबंधित आहे. ही आधुनिक माहिती वाचकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours