Skip to product information
Bharatiya Swatantryache Pranete Maharaja Yashwantrao Holkar | भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते महाराजा यशवंतराव होळकर | By Sanjay Sonawani संजय सोनवणी
Sale price  Rs. 190.00 Regular price  Rs. 200.00
Pages: 136
Language: Marathi
Overview:
महाराजा यशवंतराव होळकरांनी दुसरा बाजीराव पेशव्याने घशात घातलेले होळकरांचे राज्य बलाढ्य सेनांशी लढून स्वतंत्र केले आणि ६ जानेवारी १७९९ रोजी राज्याभिषेक करून घेतला. स्वतःची राजमुद्रा घोषित केली आणि स्वतःची नाणी पाडायला सुरुवात केली. शिवरायांनंतरचे ते एकमेव स्वतंत्र अभिषिक्त महाराजा बनले. नंतर त्यांनी इंग्रजांच्या जोखडातून देश मुक्त करण्यासाठी अथक लढा दिला. ते इंग्रजांचा वसाहतवादी दृष्टीकोन ओळखून त्यांच्याविरुद्ध सर्वकश युद्ध पुकारणारे आद्य स्वातंत्र्य योद्धे होत.त्यांनी इंग्रजांशी एकूण १८ युद्धे केली व सर्व युद्धांत त्यांनी इंग्रजांना पराजित केले. त्यातील मुकंदऱ्याचे आणि भरतपूरचे युद्ध हे जागतिक युद्धेतिहासात मानाचे पान बनून बसली आहेत. त्यांच्या अजोड युद्धतंत्रामुळे यशवंतराव होळकर हे भारताचे नेपोलियन म्हणून जगभर ओळखले जातात. भारताचे स्वातंत्र्य हा त्यांचा अखेरपर्यंत ध्यास होता. मृत्यूपर्यंत स्वतंत्र, सार्वभौम राहिलेले ते एकमेव भारतीय महाराजा होत.

You May Also Like