Skip to product information
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 300.00
Overview:
पारंपरिक भाषाशास्त्र बव्हंशी कालबाह्य ठरले असून त्याची जागा आता आधुनिक भाषाविज्ञानाने घेतली आहे. वर्णनात्मक भाषाविज्ञान, ऐतिहासिक भाषाविज्ञान, तुलनात्मक भाषाविज्ञान, बोली भूगोल, भू-भाषाविचार, कोशविचार... अशा आधुनिक भाषाभ्यासाच्या विविध शाखा आहेत, परंतु त्यांचा अभ्यास मांडणारे ग्रंथ मराठीत अत्यल्पच आहेत. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांनी आपल्या मराठीच्या अभ्यासक्रमांत आधुनिक भाषाविज्ञानाचा जाणीवपूर्वक समावेश केलेला आहे, म्हणून अभ्यासग्रंथांची ही गरज काही अंशी तरी भागवावी, या हेतूने ‘भाषाविज्ञान : वर्णनात्मक आणि ऐतिहासिक’ हा ग्रंथ सादर केला आहे. वर्णनात्मक आणि ऐतिहासिक भाषाविज्ञानाच्या मूलतत्त्वांचा परिचय व्हावा, त्या विषयीच्या प्रगत अध्ययनाची दिशा समजावी आणि या ज्ञानशाखांतील नव्या विचारधारांकडे अभ्यासकांचे लक्ष वेधावे, ही दृष्टी प्रस्तुत संपादनामागे आहे.

Pickup currently not available