मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. त्याच्या जीवनातील प्रत्येक टप्प्यावर तो इतर व्यक्तींशी संवाद साधतो, नातेसंबंध जोडतो आणि समाजाचा एक भाग म्हणून कार्य करतो. यामध्ये भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता ह्या संकल्पना महत्त्वाची भूमिका बजावतात. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? ह्या संकल्पना शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यक्तीच्या प्रगतीसाठी उपयोग करून कशा विकसित करता येतील याचे अभ्यासपूर्ण विवेचन या पुस्तकात केलेले आहे. ‘भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता एक अभ्यास’ हे पुस्तक म्हणजे व्यक्तीच्या प्रगतीला उन्नत व विकसित करणारे ठरणार आहे. या पुस्तकात बुद्धिमत्ता, भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता, अध्यात्मिक बुद्धिमत्ता, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा मानवी जीवनाशी कसा संबध येतो ह्या संकल्पना शब्दबद्ध केल्या आहेत. व्यक्तीला उच्च यशाकडे/प्रगतीकडे या संकल्पना भविष्यात प्रभावी ठरून शिक्षणक्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाज या सर्वांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours