Skip to product information
Billabong | बिल्लाबाँग By Akshay Daya Mohite |  अक्षय दया मोहिते
Sale price  Rs. 585.00 Regular price  Rs. 650.00
Pages: 491
Language: Marathi

नाव आनंदनगर असलेली बकाल झोपडपट्टी आणि मॅट्रिमोनियल कंपनीचं चकचकीत कॉर्पोरेट ऑफिस ह्या दोन परस्पर-व्यस्त अवकाशांमध्ये जगू पाहणाऱ्या डॅनी या जेन-झी पिढीतल्या अनाथ तरुणाची आणि त्याच्या भोवतीच्या अभावग्रस्त जगाची कहाणी सांगणारी ही कादंबरी आशय, रूप आणि भाषा अशा सर्व अर्थांनी एकविसाव्या शतकाची कादंबरी आहे. झोपडपट्टीमधलं, अधोलोकातलं वास्तव ही गोष्ट मराठी कादंबरीसाठी नवी नाही. पण 'बिल्लाबाँग'मध्ये लेखकाने ह्या वास्तवाचा खोलपर्यंत ढवळलेला तळ आणि त्यातून उफाळलेलं जीवनाचं गदळ मराठी वाचकांच्या सरळसुत आकलनकक्षेला उद्ध्वस्त करणारं आहे. भणंग तरुणाईला पोटात घेणारा फ्लायओव्हर, समाजाने हद्दपार केलेल्या तृतीयपंथीयाला आश्रय देणारं कबरस्तान, रेल्वे रुळांलगत फोफावलेल्या झोपडपट्टीतल्या बायामाणसांची जगण्यासाठीची अमानुष धडपड, खूनखराबा, आत्महत्या वगैरे दुःखाने विव्हळण्यापासून आनंदाने चिरकण्यापर्यंतचे अनेक आवाज, गर्द काळोखापासून लालबुंद रक्तापर्यंतचे सगळे रंग ह्यांचे अत्यंत जोरकस स्ट्रोक्स मारून काढलेलं हे जबरदस्त लँडस्केप आहे. ह्यातले अनेक आवाज आणि कित्येक रंग मराठी साहित्यात निर्विवादपणे प्रथमच अवतरले आहेत. कादंबरीभर पसरलेली ना ना तऱ्हाची बधीर करणारी नशा आणि संपता न संपणाऱ्या लांबच लांब पसरलेल्या रात्रींनी ही कादंबरी व्यापली आहे. सगळ्यात कहर म्हणजे 'बिल्लाबाँग'ची भाषा. अनुभवाच्या पोतानुसार चपळाईने नागमोडी वळणं घेत बदलणारी, कधी उपहास-उपरोधप्रधान तर कधी प्रतिकात्मक, कधी असह्य वास्तवाचे चरचरीत चटके देणारी इथल्या पात्रांची, निवेदकाची, सबंध अवकाशाचीच ही भाषा आहे. या भाषेशिवाय ही कादंबरी अशक्य होती. 'बिल्लाबाँग' ही कादंबरी मराठी कादंबरी विश्वावर एखाद्या बॉम्बसारखी कोसळली आहे. ती वाचू पाहणारा प्रत्येक वाचक तिच्या ज्वाळांमध्ये होरपळून निघणार आहे. ---- नीतीन रिंढे

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Billabong | बिल्लाबाँग By Akshay Daya Mohite | अक्षय दया मोहिते

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like