Skip to product information
Bruhat Gitashastra Khand 1 & 2 | बृहत गीतशास्त्र खंड 1 व 2 by राजेंद्र खेर | Rajendra Kher
Sale price  Rs. 1,700.00 Regular price  Rs. 1,798.00
Pages: 1365
Language: Marathi
Overview:
श्रीमद्भगवद्गीतेवरील द्वि-खंडांत्मक भाष्याचा हा पहिला खंड. प्रस्तुत खंडात पहिला अध्याय 'अर्जुनविषादयोग 'पासून सातवा अध्याय 'ज्ञानविज्ञानयोग 'पर्यंत विस्तारपूर्वक भाष्य केले आहे. त्यासाठी जवळपास पन्नास टीकांचा संदर्भ घेतला आहे; त्याशिवाय वेदोपनिषदांतील सिद्धान्त, पुराणकथा, गीता-विचारांना पुष्टी देणारे आधुनिक वैज्ञानिक सिद्धान्त, दृष्टान्तकथा, कौटुंबिक सामाजिक जीवनातील उदाहरणं इत्यादींची योजना संदर्भानुरूप केली आहे. तात्त्विक भाषेची अभिव्यक्ती राखतानाच यथाशक्य सरळ-सोप्या भाषेत लेखन केले आहे. गीता अभ्यासकांना निरूपणासाठी प्रस्तुत भाष्य आधारभूत ठरेल; अभ्यासकांबरोबरच तरुण वाचकांनाही ग्रंथ-विषय सहज समजतील, प्रेरणादायी ठरतील; असा विश्वास वाटतो. श्रीमद्भगवद्गीतेवरील द्वि-खंडांत्मक भाष्याचा हा दुसरा खंड. प्रस्तुत खंडात आठवा अध्याय 'अक्षरब्रह्मयोग' पासून अठरावा अध्याय 'मोक्षसंन्यासयोग' पर्यंत विस्तारपूर्वक भाष्य केले आहे. त्यासाठी जवळपास पन्नास टीकांचा संदर्भ घेतला आहे; त्याशिवाय वेदोपनिषदांतील सिद्धान्त, पुराणकथा, गीता-विचारांना पुष्टी देणारे आधुनिक वैज्ञानिक सिद्धान्त, दृष्टान्तकथा, कौटुंबिक-सामाजिक जीवनातील उदाहरणं इत्यादींची योजना संदर्भानुरूप केली आहे. तात्त्विक भाषेची अभिव्यक्ती राखतानाच यथाशक्य सरळ-सोप्या भाषेत लेखन केले आहे. गीता अभ्यासकांना निरूपणासाठी प्रस्तुत भाष्य आधारभूत ठरेल; अभ्यासकांबरोबरच तरुण वाचकांनाही ग्रंथ-विषय सहज समजतील, प्रेरणादायी ठरतील; असा विश्वास वाटतो. सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान म्हणून भगवद्गीतेला जगात सर्वदूर मान्यता आहे. अनेक देशी-विदेशी विचारवंतांनी गीतेच्या तत्त्वज्ञानावर आपलं जीवन घडवलं आहे. गीताविचार समजून घेऊन त्यानुसार कृती केली तर व्यक्तिगत-कौटुंबिक-सामाजिक प्रश्न सहज दूर होऊ शकतील आणि खऱ्या अर्थाने मानवतेची प्रस्थापना होऊ शकेल. या दृष्टीने प्रस्तुत भाष्य नव्या पिढीसाठी पथदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Bruhat Gitashastra Khand 1 & 2 | बृहत गीतशास्त्र खंड 1 व 2 by राजेंद्र खेर | Rajendra Kher

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like