Skip to product information
बुटक्यांचे बेट | Butakyanche Bet
Sale price  Rs. 403.00 Regular price  Rs. 575.00
Pages: 320
Language: Marathi

बाळासाहेब लबडे यांची 'बुटक्यांचे बेट' ही या नव्या पर्वातली एक प्रयोगशील कादंबरी आहे. समकालीन तंत्रज्ञात्मक बदल आणि त्यांचा राजकीय सामाजिक जीवनावरील प्रभाव ह्या विषयावर आधारलेली ही एक तंत्रवैज्ञानिक काल्पनिका आहे. यापूर्वी रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांना केंद्रस्थानी ठेवून आर्थर क्लार्क, आयॉक असिमोव्ह, फ्रैंक हर्बर्ट ह्यांनी विज्ञान काल्पनिका लिहिल्या आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानातील शोधांमुळे माणसाचे आंतरिक भावविश्व आणि बाह्य जगातील सामाजिक व संस्थात्मक जीवन यावर होणान्या परिणामांचा वेध घेणान्या या काल्पनिका वाचकाला विज्ञानाबद्दल आणि भविष्याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतात. 'बुटक्यांचे बेट' ही या परंपरेतली कादंबरी आहे. समकालीन मराठी साहित्यात तंत्रज्ञान, राजकारण आणि मानवी मूल्यांचा संगम साधणाऱ्या कादंबन्यांची संख्या फारच कमी आहे. या पार्श्वभूमीवर 'बुटक्यांचे बेट ही कादंबरी केवळ एक काल्पनिक कथा नसून आजच्या युगाच्या गुंतागुंतीच्या वास्तवाला भिडणारा एक विचारप्रवर्तक साहित्यिक हस्तक्षेप ठरते. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलणान्या जगात माणूस, त्याची संवेदना आणि त्याचे नैतिक अस्तित्व यांची होत चाललेली झीज या कादंबरीत प्रभावीपणे उलगडली जाते. एका काल्पनिक बेटावर उभ्या केलेल्या बुटकेवाडी आणि उंचवाडी या दोन परस्परविरोधी जगांतून लेखकाने आधुनिक समाजाची रूपकात्मक मांडणी केली आहे. एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता, उपभोगबाद, सत्ताकेंद्रितता आणि नैतिक अधःपतन; तर दुसऱ्या बाजूला साधेपणा, निसर्गनिष्ठ जीवन आणि मानवी मूल्यांचा शोध या द्वंद्वातून कादंबरी आपल्याला वर्तमानाचे आरसे दाखवते. ही कादंबरी पारंपरिक कथनरचनेच्या चौकटी मोडणारी आहे. पोस्टमन उर्फ कबीर हा सूत्रधार, त्याच्या सोबतीला असलेले डिजिटल कबुतर, तसेच इतिहास, मिथक आणि वर्तमान यांची एकत्रित विण या सान्यांतून लेखकाने एक बहुपरिमितीय कथाविश्व उभे केले आहे. या कथनतंत्रामुळे कादंबरी केवळ वाचनाचा अनुभव राहत नाही, तर ती विचारप्रक्रियेचा एक प्रवास बनते. राजकीय वास्तवावर भाष्य करणारी, सत्तेच्या खेळांचे भंडाफोड करणारी आणि लोकशाहीतील अंतर्विरोध उघड करणारी ही कादंबरी आपल्या काळाचा दस्तऐवज ठरते. त्याचवेळी महात्मा गांधींच्या विचारांद्वारे आत्मनिर्भरता, मूल्यशिक्षण आणि मानवी पुनर्जागरणाची दिशा सुचवणारी ही कृती आशेचा किरणही दाखवते. तर तुकारामांच्या तत्त्वनिष्ठतेचा अविष्कार घडविणारी आहे. विज्ञानकाल्पनिका, रूपक, राजकीय व्यंग आणि तात्त्विक चिंतन यांचा संगम असलेली 'बुटक्यांचे बेट' ही कादंबरी समकालीन मराठी साहित्यात एक महत्त्वपूर्ण आणि प्रयोगशील टप्पा ठरते. बदलत्या तंत्रज्ञानयुगात साहित्याची नवी शक्यता काय असू शकते, याचे प्रभावी उत्तर ही कादंबरी देते. ही केवळ एका बेटाची कथा नाही तर ती आपल्या समाजाची, आपल्या काळाची आणि कदाचित आपल्या भविष्याचीही गोष्ट आहे. - डॉ. रमेश वरखेडे

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

बुटक्यांचे बेट | Butakyanche Bet

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like