Skip to product information
चैत्रबन – गीतगोपाल | Chaitraban – Geetgopal by G. D. Madgulkar avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 360.00 Regular price  Rs. 400.00
Language: Marathi

श्रीकृष्णचरित्रांतील कृष्णजन्मापासून मथुरागमनापर्यंतचा कथाभाग या पस्तीस गीतांतून गुंफला आहे. विरही राधेला स्फुरला असेल, स्मरण असेल तसा. पुरेत गाणीं शृंगाराचीं । कृष्णसख्याच्या व्यभिचाराची ॥ असें ज्यांना खरेंच वाटतें, त्यांच्यासाठी हा प्रयत्नच नाही. राम-कृष्णांचे देवत्व ज्यांनी श्रद्धेने मानलें आहे त्यांना हीं गीतें आवडावीं. बुद्धीचे पाय जडतेशीं जखडलेले आहेत. श्रद्धेला पंख असतात. माझे मित्र श्री. जयंतराव साळगांवकर यांच्या ‘शब्दरंजन’ मासिकासाठी या गीतावलीचा प्रारंभ झाला. मासिकाचें प्रकाशन थांबलें तेव्हा माझें लेखनहि थांबलें होतें. श्री. भा. द. खेर व श्री.

वि. स. वाळिंबे या मित्रांच्या आग्रहामुळे हीं गीतें मी पुन्हा लिहूं लागलों. सह्याद्रींतून ती क्रमश: प्रसिद्ध झालीं. आता हीं गीतें पुस्तक-रूपाने प्रकाशित होत आहेत. ‘केसरी’ प्रकाशनाचे श्री. जयंतराव टिळक यांचा मी मन:पूर्वक ऋणी आहें. श्री. सालकरांनी चित्रें उत्तम काढलीं आहेत. त्यांचे आभार. – ग. दि. माडगूळकर माडगूळकरांच्याजवळ स्पृहणीय रचनापाटव आहे. गीतातील भावनामक आशयाला फारसा धक्का न लावता आणि शब्दसौष्ठवाला बळी न देता ते एक परिपूर्ण गीत रचू शकतात.

‘चैत्रबना’तील पदे त्यांतील नेमक्या व मोजक्या प्रतिमांनी हृदयास अचूक भिडतात. ही प्रतिमासृष्टी पारंपरिक असली, तरी माडगूळकरांच्या प्रतिभेने त्यांना चित्ताकर्षक मखर करून दिले आहे. संतांच्या आणि शाहिरांच्या प्रतीकांना नि प्रतिमांना ‘चैत्रबना’ने विशेष आवडीने अंगावर मिरवले आहे. त्यांच्या चपखल प्रतिमा अनेकदा डोळ्यांना दिसतात, कानांशी वाजतात. नाकांशी गंध उधळतात. इंद्रियसंवेदनांना त्या प्रतिमा जागवतात आणि त्यांवर भावनांची ठळक मुद्रा रेखतात. शब्दांची निवड, त्यांची गोठवण, अचूक अलंकाररचनेचे चिरेबंद शिल्प, आशयाची पातळी या सर्व बाबतींत माडगूळकरांची पदे जो संस्कार मनावर करतात त्याचे वर्णन मी ‘अभिजात’ या संज्ञेनेच करीन. माडगूळकरांना लावण्या फार चांगल्या जमतात व भक्तिपर गीते लिहिताना ते ‘संत’च बनतात. गंमत अशी की, या दुहेरी किमयेने ते मराठी काव्यपरंपरेच्या आत्मीय गुणांनाच हात घालतात, आपले पुराणे संस्कार जागवतात, चाळवतात. ‘चैत्रबना’त म्हणून वाचक हरखतो आणि दूरच्या प्रवासाला जाऊन परतण्यास नाखूश असतो. प्रा. रा. ग. जाधव हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

चैत्रबन – गीतगोपाल | Chaitraban – Geetgopal

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like