Skip to product information
Sale price
Rs. 324.00
Regular price
Rs. 360.00
Overview:
संघर्षाच्या चिखलात यशाचं कमळ फुलावं लागतं. तो चिखलच जर नसेल, तर जगण्याला तरी काय अर्थ आहे ? अपयशाची चव कधी चाखलीच नाही तर अर्थसंपन्न आयुष्यसुद्धा अर्थशून्य भासायला लागतं! आयुष्य म्हणजे केवळ लपाछपीचा खेळ आहे. काय लपून राहील आणि काय सापडेल ह्याचा हिशेब आजवर तरी कोणालाही करता आलेला नाही. प्रत्येकाचा मृत्यू हा भविष्यकाळात दडलेला असला तरी तो मनोमन कोणालाच नको असतो. निसर्गनियमाप्रमाणे मरण येणारच! कर्मधर्म संयोगाने जर मरणाचा दिवस तुम्हाला आजच कळला, तर त्याचं स्वागत करणार की त्या दिवसापर्यंत तीळ तीळ तुटून रोजच मरणार ? हा अजब प्रश्न तुम्हीच तुमच्या मनाला विचारा. उत्तरादाखल एकाचंही मन मृत्यूच्या स्वागताला सिद्ध होणार नाही ! भले मग तो त्यागी असो अथवा भोगी असो. चालत्या गाड्याला खीळ बसली तर एखादवेळेस काढता येते. पण मरणाच्या थरकाप भीतीने मनाच्या गाड्याला बसलेली खीळ कशी काढणार ? भविष्यकाळाचं चक्र उलट फिरलं आणि खीळ बसलेल्या मनाचं चक्र सुलट फिरलं, ...तर काय घडू शकतं हा थरार चितारणारी चित्तरकथा म्हणजेच चक्रवर्ती !!!!

Pickup currently not available