Skip to product information
CHIRANJEEV MIRAS | चिरंजीव मीरास By ANIL KARKHANIS | अनिल कारखानीस
Rs. 350.00
Pages: 200
Language: Marathi

1892 मध्ये जन्मलेली मॅडेलिन स्लेड ही ब्रिटिश अॅडमिरलची मुलगी वयाच्या पंधराव्या वर्षी बीथोव्हन संगीताच्या प्रेमात पडली. नंतर ती फ्रान्समध्ये गेली, तिथे रोमा रोलाँ या तत्त्वज्ञाच्या संपर्कात आली. त्यांनी लिहिलेले महात्मा गांधी यांचे चरित्र वाचून प्रभावित झाली. वयाच्या 33 व्या वर्षी म्हणजे 1925 अखेर भारतात आली, साबरमती आश्रमात राहिली. गांधींची मानसकन्या झाली. गांधींनी तिचे नामकरण 'मीराबेन' असे केले. पुढील 23 वर्षे ती गांधींच्या सहवासात राहिली. गांधींनी सोपवलेल्या देश-विदेशांतील जबाबदाऱ्या पार पाडत राहिली. सेवाग्राम आश्रमाच्या उभारणीतही तिचे मोठे योगदान राहिले. गांधींच्या मृत्यूनंतर उत्तर भारतात आश्रम उभारून शेती व पर्यावरण या क्षेत्रांत काम करीत राहिली. 1959 मध्ये ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना येथे स्थायिक झाली. 1982 मध्ये मृत्यू झाला, त्याच्या एक वर्ष आधी तिला पद्मविभूषण देण्यात आला. कमालीचे रोमहर्षक आयुष्य जगलेल्या मीराबेनला गांधींजीनी 1924 ते 1948 या 23 वर्षांत लहान-मोठी अशी 386 पत्रे लिहिली होती, त्यांचे संकलन असलेले पुस्तक 'बापूज् लेटर्स टू मीरा' या नावाने 1950 मध्ये आले. त्या पुस्तकातील निवडक 254 पत्रांचा अनुवाद असलेले हे पुस्तक आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

CHIRANJEEV MIRAS | चिरंजीव मीरास By ANIL KARKHANIS | अनिल कारखानीस

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like