किशोरवय..... वयाने मोठ्धा झालेल्या प्रत्येक व्यक्तिच्या मनातला हुळवा कोपरा. बालपणातल्या, किशोर क्यातल्या आठवणी अजूनही प्रत्येक प्रौढ मनात दंगा-मस्ती करत असतात, हळूच चिमटे काढत असतात. दोसतार मधल्या टंप्या, एल्प्या आणि त्यांच्या मित्राबरोबर (कथा नायक) आपणही सातारच्या नव्या शाळेत प्रवेश करतो आणि त्या तिघांच्या जीवनाचा भाग बनून जातो. या मुलांनी केलेली मस्ती, घातलेले गोंधळ विध्वंसक नाहीत. ही मुलं फक्त उचापती करतात. त्यांच्या मनातल्या द्वाड भावना आपल्याच बालपणीतल्या असल्याने आपण नकळत कथानायकाच्या बाजूचे होतो. लेखकाच्या नर्म विनोदी शैलीमुळे आणि अचूक निरीक्षण शक्तीमुळे ठायी ठायी हास्याची कारंजी उसळतात आणि कधी डोळ्यांच्या कडा ओलावतात. शाळेतले समारंभ, त्यातली फजिती, शाळेचा अभ्यासक्रम, त्यातली निरर्थकता यातूनही बिनोद निर्माण होतात. तुटका हौद, गळक्या तोट्या यांनी आपल्यालाही लहानपणी बेजार केलं होतं, याची आठवण येते. माझा पहिला विमानप्रवास आणि माझे बाबा हे मुलांचे निबंध वाचताना तर हसून हसून मुरकुंडी बळते. मुलांची परीक्षा, सहल, शिक्षक दिन या अनुभवांनी मुलांचं ते शहाणं होत जाणं वाचकांनाही अंतर्मुख करतं.
मुलांच्या निखळ, निरागस जगात मोठ्यांनी वावरायचं आणि त्यातली गंमत अनुभवून आयुष्याचा अर्थ शोधायचा हे खरं तर कठीण काम. पण लेखकाने ते लीलया यशस्वी केलं आहे. श्री. चकोर शाह लिखित दोसतारला खूप खूप शुभेच्छा
- डॉ. स्मिता दातार -
डॉक्टर, लेखिका
Pickup available at HO
Usually ready in 24 hours