Skip to product information
Sale price
Rs. 960.00
Regular price
Rs. 1,025.00
Overview:
*1. तापलेल्या पृथ्वीची गोष्ट (नविन प्रकाशित) हवामान बदल म्हणजे काय, ही समस्या खरोखरच आपल्या सर्वांच्या निष्काळजीतून तयार झाली आहे का, मी वैयक्तिक पातळीवर यावर काय करू शकतो.... हे आणि असे अनेक प्रश्न वेळोवेळी विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून आणि नागरिकांकडून येत असतात. या शंकेचे निरसन करण्यासाठी इंग्लिश मध्ये अनेक छान पुस्तक आणि साहित्य उपलब्ध आहे. पण साध्या सोप्या दैनंदिन मराठी भाषेत यावर एकही मार्गदर्शक पुस्तक नाही. सामान्य माणसाच्या मनात येणाऱ्या प्रश्नांप्रमाणे मी या पुस्तकाची मांडणी केली आहे. त्यात भारतातील आणि जगातील उदाहरणे दिली आहेत. *2. द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर पृथ्वीच्या परिभ्रमणावर झाडांचा प्रभाव पडतो! किंवा लांडगे नदीचा प्रवाह बदलतात हे तरी? आणि रानडुकरांच्या संख्येवर गांडुळं नियंत्रण ठेवतात? निसर्गसृष्टीतले परस्परसंबंध गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट असतात. यांपैकी अनेक संबंधांची आपल्याला कल्पनाही नाही. पण याच नात्यांमुळे निसर्गात सूक्ष्म समतोल राखला जातो. वनरक्षक म्हणून अनेक दशकं केलेल्या कामाचा अनुभव आणि नवनवीन वैज्ञानिक संशोधनाचा आधार घेत पीटर वोह्ललेबेन आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत नेतात. त्यात निरनिराळे प्राणी, वनस्पती, नद्या, दगड आणि हवामान एकमेकांबरोबर सहकार्य करत निसर्गाची नाजूक प्रणाली संतुलित ठेवतात. पीटर वोह्ललेबेन हे फक्त डोळ्याने बघत नाहीत. एका दिव्य दृष्टीतून त्यांना निसर्ग दिसतो. आपल्यासारख्या प्रत्येकाला त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. *3. द हिडन लाईफ ऑफ ट्रीज अद्ययावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलांच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात याचा उलगडा वाचकांना सहज होतो. पथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतींचे जीवन हे मानवी. कुटुंबरचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे पीटर वोह्ललेबेन ‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ या पुस्तकातून दाखवतात. जंगलातील झाडे आपल्या पिलांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, पोषणद्रव्ये पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात, आजारपणात शुश्रूषा करतात आणि धोक्यांची पूर्वसूचनाही देतात. अशा सहजीवनात वाढणार्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायू लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणार्या झाडाचे जीवन मात्र खडतर असते. जंगलात राहणार्या आपल्या स्वजातीयांपेक्षा त्यांचे आयुष्यही कमी असते. जगभरात लोकप्रिय झालेल्या या पुस्तकात वोह्ललेबेन यांचे जंगल आणि वनस्पतींवरचे अपार प्रेम स्पष्ट दिसते. या पुस्तकातून सामान्य वाचकाला झाडांच्या जीवनचक्राची ओळख होते. ही जाणीव झाल्यावर जंगलातून हिंडताना आपल्याला एक वेगळाच अनुभव मिळेल, हे निश्चित.

Pickup currently not available