प्रस्तुत ग्रंथामुळे स्त्रियांचे अनेक शारीरिक, आरोग्यविषयक आणि सामाजिक प्रश्न व्यापकपणे समाजासमोर आले आहेत.गर्भारपणातील आरोग्यविषयक आणि सामाजिक समस्यांची अतिशय सुबोध अशी चर्चा आणि उपायांसंबंधीचे मार्गदर्शन या ग्रंथात करण्यात आले आहे. डॉ. सुधीर रसाळ ज्येष्ठ समीक्षक व लेखक पाना-पानांवर लेखिका जे कळकळीने सांगतात,ते केवळ स्त्री आणि तिच्या नातेवाइकांसाठीच नाही.नव्या डॉक्टरांसाठीही एक संयत आणि समष्टीच्या कल्याणाचा सूर असणारा एक अप्रत्यक्ष हितोपदेश आहे.
– डॉ. वृषाली किन्हाळकर आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. मातृत्व स्वीकारताना गर्भवतीची काळजी कशी घ्यावी व परिपूर्ण बालसंगोपन कसे असावे याची संपूर्ण माहिती असल्यास गर्भारपण व बालसंगोपनातील अडचणी दूर होऊन पालकत्वाचा पुरेपूर आनंद मिळतो.
या पुस्तकाची रचना करताना गर्भवती व बालसंगोपनाविषयी प्रत्येक मुद्याबाबत पुरेशा प्रमाणात आणि अचूक विवेचन केले आहे. त्यामुळे प्रत्येक जोडप्यास हे पुस्तक उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल, अशी आशा आहे. घरी बाळ येणार हे नक्की झाल्यापासून पाच वर्षांपर्यंत उपयुक्त ठरणारे मार्गदर्शक पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours