गर्भसंस्कार हा आमच्या पूर्वजांनी दिलेला अनमोल ठेवा आहे. ह्या पूर्वापार चालत आलेल्या शास्त्रीय व आध्यात्मिक ज्ञानाला नवीन विज्ञान व संशोधनाची जोड मिळाल्याने गर्भसंस्कारशास्त्र अजूनच परिपूर्ण व उपयुक्त झाले आहे. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपले मूल बुद्धिमान, सुंदसर, सद्गुणी व्हावे. आपल्या धर्मग्रंथांनी, महापुरुषांनी हे सिद्ध करून दाखविले आहे की, मुलावर गर्भात असतानाच संस्कार केल्यास ते जास्त प्रभावी ठरतात. सुभद्रा, कौशल्या, माँ जिजाऊ, त्रिशला, राणी मदलसा, मदर मेरी, भुवनेश्वरी देवी यांच्या उदाहरणावरून आपल्याला हे सहज पटू शकते.
गर्भसंस्काराच्या माध्यमातून आपल्या मुलाला आयुष्यभर साथस देईल अशी शिदोरी आपण देत असतो. कारण गर्भारपणात बाळाची प्रत्येक नवीन पेशी तयार होतानाच आई-वडिलांच्या जीन्समधून जे घटक बाळामध्ये संक्रमित होतात, त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. गर्भसंस्काराच्या ज्ञानाचा वापर करून गर्भारपणातील नऊ महिने जर आहार, विहार, संस्कार व या पुस्तकात दिलेल्या इतर बाबींचे आचरण केल्यास होणारी संतती नक्कीच तेजस्वी व बुद्धिमान होईल. त्यामुळे मुलांच्या उत्तम जडण-घडणीचा प्रवास सुखकर होण्यास ही पायाभरणीच ठरेल. देशाची भावी पिढी घडविण्यात खारीचा वाटा उचलणारे आणखी एक पुस्तक आपल्या हाती देतानार मनस्वी आनंद आणि समाधान वाटत आहे.
————————————————————————————————————————- आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. मातृत्व स्वीकारताना गर्भवतीची काळजी कशी घ्यावी व परिपूर्ण बालसंगोपन कसे असावे याची संपूर्ण माहिती असल्यास गर्भारपण व बालसंगोपनातील अडचणी दूर होऊन पालकत्वाचा पुरेपूर आनंद मिळतो. या पुस्तकाची रचना करताना गर्भवती व बालसंगोपनाविषयी प्रत्येक मुद्याबाबत पुरेशा प्रमाणात आणि अचूक विवेचन केले आहे. त्यामुळे प्रत्येक जोडप्यास हे पुस्तक उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल, अशी आशा आहे. घरी बाळ येणार हे नक्की झाल्यापासून पाच वर्षांपर्यंत उपयुक्त ठरणारे मार्गदर्शक पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours