एकध्येयवेडा प्रवास
जगण्याशी नातं जोडत, डोंगर दऱ्यांच्या अंगाखांद्यावर खेळत डोळ्यांच्या पापण्याआड जपलेले स्वप्न... लाल अंबर दिव्वाची गाडी... ठाणगांव (सिनर) सारख्या खेडेगावातल्या वेड्यावाकड्या वळणावरच्त्वा रस्त्यांवरून डौलात जाणान्या त्या गाडीच्या वेगानं मनात घर केलं... एका हातात पुस्तक अन् दुस-या हातात गुरेढोरे वळण्याची काठी घेऊन केलेला अभ्यास... उराशी जपलेली उर्मी कोच विझू दिली नाही... हिरव्यागार शेतांमधली लावणी माझ्या मनात भविष्य हिरवं होऊन रुजलं.. संपर्षातही साथ होती स्वप्नांची...
त्यामुळे आकाशातलं चांदणंही माझ्या सोबतीला सतत..! हळूहळू हे जे बी रुजले ते पूढे तरारून वर आलं.. ज्या क्षणी मी अपवशी व्हायचो त्या क्षणी माझ्या मनात दडलेलं ते स्वप्न अधिक गहीरं व्हायचं. मला सतत काही तरी खुणवायचं. मी यू.पी.एस.सी. उत्तीर्ण होऊन आज अधिकारी झालो. अशक्य काहीच नाही... बस... फक्त जिगर हवी, जिद्द हवी, स्वप्नांशी तडजोड नको. कष्टाची पर्वा नको, भविष्य आपल्या हातानं स्वप्नांच्या झुल्यावर सजवता येतं. कृतायाँनं झुलता येतं.. -भरत आपळे IRS
Pickup available at HO
Usually ready in 24 hours