Skip to product information
गावसासू | Gavsasu by श्री. व्यं. केतकर | S. V. Ketkar
Sale price  Rs. 144.00 Regular price  Rs. 160.00
Overview:
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे. का नसावा ? त्यांनी ज्ञानकोशाच्या तेहतीस खंडांनी ज्ञानसागराचे मंथन करून महाराष्ट्राच्या करतालावर अमृताचा नैवेद्य ठेवला; त्यांनी समाजशास्त्रीय दृष्टीने मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य यांचा वेध घेतला : त्यांनी वेलीसारख्या वेटोळे घालून बसलेल्या मराठी कादंबरीला घनदाट अरण्याचे रूप दिले. मीच हे सांगितलेपाहिजे अशा स्वभावाचे शेजवलकर , श्रीकेक्षी आणि दुर्गाबाई यांना त्यांनी मोहित केले - गावसासू एनआरआय यांचा प्रश्न आज ऐरणीवर आला आहे : १९३० सालीच त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी गावसासू - परागंदा भारतीयांचे एक सामाजिक दृश्य या कादंबरीत केले आहे. केतकरांना विदेशवस्तव्याचा अनुभव होता आणि त्यांच्यापाशी एक व्यासंगनिष्ठ समाजशास्त्रीय दृष्टी होती: मग त्यांची कादंबरी गतकाळातच आजच्या आपल्या सामाजिक वास्तवाचा वेध घेऊ शकली यात आश्चर्य कसले ? मात्र गावसासू मिसेस दास आणि तिच्या मुली यांच्याभोवतीच्या स्वैर जीवनाचे चित्रण कितपत वास्तव आहे, या शंकेने वाचक अस्वस्थ होतो खरा ! - डॉ. द. भि. कुलकर्णी हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

You May Also Like