Skip to product information
Gelya Shambhar Varshatalee Yuddha| गेल्या शंभर वर्षातली युद्धं By  Nilu Damale | निळू दामले
Sale price  Rs. 240.00 Regular price  Rs. 299.00
Pages: 196
Language: Marathi

माणसं म्हातारी होऊन मरतात, रोग होऊन काहीशी अकाली मरतात. माणसं कधी तरी मरणारच.

माणसाला मरण नकोसं वाटतं. माणसं जास्तीत जास्त जगावीत असा विचार माणूस करतो. त्यासाठी अन्नव्यवस्था, उपचार व्यवस्था, औषध व्यवस्था तयार करतो.

पण याच माणसानं मरण कवटाळण्याचीही व्यवस्था केलीय. युद्ध ही ती व्यवस्था आहे.

इसवीसनपूर्व पाचव्या शतकापासून ते इसवीसन 1900 पर्यंतच्या 2400 वर्षात युद्धात सुमारे 30 कोटी माणसं मारली गेली. विसाव्या शतकात शंभर वर्षात सुमारे 19 कोटी माणसं युद्धात मेली. विसाव्या शतकापासून आज एकविसाव्या शतकाची पंचवीस वर्षं होत असताना सुमारे 19.20 कोटी माणसं युद्धात मेलीयत. चोवीसशे वर्षात 30 कोटी आणि सव्वाशे वर्षात 19.20 कोटी.

क्षणार्धात पाच पासून पन्नास माणसं खलास करता येतात. टोलेजंग इमारत क्षणार्धात जमीन दोस्त करता येते. इथं बसून यंत्रणेला आज्ञा द्यायची, पाच हजार मैलावरची माणसं आणि इमारती नष्ट होतात. पूर्वी माणसं मागास होती तेव्हां स्वतःचा जीव धोक्यात घालून समोरच्या एका माणसाला मारायची. आता मारणारा माणूस खूप अंतरावर असतो, सुंदर वातावरणात मजेत असतो, कीबोर्डावरची एक की दाबली की दूरवर धडाम, बटन दाबणारा सुखात.

माणसाला काय झालंय कळत नाही. माणसं कोणाला तरी मारण्याची वाटच पहात असतात. मारण्यासाठी शत्रू शोधत असतात. आणि त्याला शत्रू पटापट मिळतातही. आपल्यापेक्षा वेगळा तो शत्रू. जो आपल्यासारखा नाही तो मरायच्या लायकीचा. आपण श्रेष्ठ. बाकीचे कनिष्ठ. कनिष्ठांनी जगता कामा नये.

माणसानं विज्ञान, तंत्रज्ञान, यंत्रज्ञानात केलेली प्रगती युद्धासाठीच केलीय की काय अशी शंका येते.

विचारही करायला नकोसं होतं अशा युद्धाचा हिशोब प्रस्तुत पुस्तकात मांडला आहे.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Gelya Shambhar Varshatalee Yuddha| गेल्या शंभर वर्षातली युद्धं By Nilu Damale | निळू दामले

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like