Skip to product information
गोग्रॅमचा चितार | Gograemcha chitar
Rs. 195.00
Pages: -
Language: Marathi

मराठी साहित्य क्षेत्रातील रहस्य-गूढ आणि भयकथा लेखकांतलं अग्रगण्य नाव म्हणजे नारायण धारप! गूढ लेखनाला अनेकदा विज्ञानाची डूब देत ही त्यांनी लेखन केलं आहे. त्यांच्या विज्ञान कथा ही तेवढ्याच ताकदीच्या आणि रंजक असतात. नारायण धारप यांचे नियमित वाचक असणाऱ्यांना त्यांच्या लेखनातला थरार आणि औतुक्य निर्माण करण्याचं सामर्थ्य ठाऊक आहेच. त्यांचे लेखन पुन्हा पुन्हा वाचलं तरी जुनं वाटत नाही किंवा कथेचा शेवट माहीत असला, तरी ज्या वळणवाटांवरून ते वाचकांना शेवटपर्यंत नेतात, त्यामुळे त्यांच्या ताजेपणा तसाच राहतो. धारप यांचा विज्ञान विषयक वाचन त्यांची कल्पकता आणि कथा फुलवत नेण्याच्या तंत्रावची हुकुमत त्यांच्या लेखनात दिसून येते."विजयचे लक्ष वर गेले. त्याला अगदी डोक्यावर एक लाल व एक पिवळा असे चमचमणारे दोन बिंदू दिसले. ताऱ्यांना रंग नसतात व ग्रह चमचम करत नाहीत . हे चमचम करणारे दोन प्रकाशबिंदू हलत होते… खाली त्याच्याकडे येत होते. कोणीतरी खूप मोठ्या आवाजात रेडिओ लावला असावा , असा आवाज येत होता . त्याच्या अवतीभवती घुमणारा तो विलक्षण आवाज तसाच चालू राहिला.. आणि विजयच्या डोळ्यांसमोर हे असे विविध रंगछटांनी चमकणारे काहीतरी त्याच्यापासून पाच फूटावरच हिरवळीवर टेकले … आणि लगेच त्याच्या नावाने हाका ऐकू येऊ लागल्या… विजय… विजय ! विख्यात भयकथा, गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची कुमारवयीन वाचकांसाठी उत्कंठावर्धक कादंबरी…

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

गोग्रॅमचा चितार | Gograemcha chitar

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like